Commonwealth Games 2022 Men's Long Jump Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुरुवारी मुरली श्रीशंकरने ( Murali Sreeshankar ) लांब उडीत ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली. पाचव्या प्रयत्नात श्रीशंकरने ८.०८ मीटर लांब उडी मारून दुसऱ्या स्थानी झेप घेतली. बहामासच्या लॅक्यून नैर्न यानेही दुसऱ्याच प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारली होती. त्यामुळे सहाव्या प्रयत्नात सुवर्ण झेप कोण घेतो याची उत्सुकता होती. भारताच्या श्रीशंकरचा प्रयत्न अयशस्वी ठरला, तर नैर्नने ७.९८ मीटर लांब उडी मारली. आता दोन्ही खेळाडू ८.०८ मीटरसह संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर होते, परंतु सुवर्णपदक हे बहामासच्या खेळाडूला दिले गेले. श्रीशंकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
नियम काय सांगतो?श्रीशंकर व नैर्न यांनी समसमान ८.०८ मीटर लांब उडी मारली. अशा परिस्थितीत खेळाडूंची दुसरी सर्वोत्तम उडी ग्राह्य धरून पदकाचा दावेदार ठरवला जातो. यावेळी नैर्नची दुसरी सर्वोत्तम उडी ही ७.९८ मीटर ही आहे आणि श्रीशंकरची ७.८४ मीटर... त्यामुळे श्रीशंकरला रौप्यपदक देण्यात आले.