शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

Commonwealth Games 2022 : Neeraj Chopra ची अनुपस्थिती पाकिस्तानच्या अर्षद नदीमच्या पथ्यावर पडली, जिंकले सुवर्ण; पाहा भारतीय कितव्या स्थानी आले 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 1:36 AM

Commonwealth Games 2022 Men's Javelin Throw - Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर भालाफेकीत पदक कोण जिंकेल याची उत्सुकता होती.

Commonwealth Games 2022 Men's Javelin Throw - Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर भालाफेकीत पदक कोण जिंकेल याची उत्सुकता होती. भारताचे डी पी मनू व रोहित यादव हे दोन स्पर्धक पुरुषांच्या भालाफेकीत आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज होते. नीरजच्या माघारीमुळे पाकिस्तानी भालाफेकपटू अर्षद नदीम याचं फावलं. त्याने ९०.१८ मीटर या स्पर्धा विक्रम व सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद करून सुवर्णपदक जिंकले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ८८.६४ मीटरसह रौप्य, तर केनियाच्या ज्युलियस येगोने ८५.७० मीटरसह कांस्य जिंकले. भारताचा डीपी मनू ( ८२.२८ मी.) व रोहित यादव ( ८२.२२ मी.) अनुक्रमे पाचवा व सहावा आला.  #men4x100mRelay पुरूषांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मुहम्मद अनास याहिया, मुहम्मद अजमल, नागनाथन पंडी व  अमोज जेकब यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने ३:०५.५१ मिनिटांची वेळ नोंदवली. 

#Women's Javelin Throw महिलांच्या भालाफेकीत उत्तरप्रदेशच्या अन्नू राणीने कांस्यपदकाची कमाई केली. तिने चौथ्या प्रयत्नात ६० मीटर फेकलेला भाला हा पदकासाठी पुरेसा ठरला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या ( २०१९ दोहा) अंतिम फेरीत पात्र ठरणारी ती भारताची पहिली महिला भालाफेकपटू ठरली होती. 

#Men's 10,000m Race Walk Final पुरुषांच्या अंतिम सामन्यात संदीप कुमार ( Sandeep Kumar) याने  38:49.21 मिनिटे अशी वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले.

#Triple Jump  अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या तिहेरी उडीत एलडोस पॉल व अब्दुल्ला अबूबाकेर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक निश्चित केले. पॉलने १७.०३ मीटर, तर अब्दुल्लाने १७.०२ मीटर लांब तिहेरी उडी मारली.  #Women4x100mRelay फायनलमध्ये दृती चंद, हिमा दास, सराबनी नंदा व ज्योती याराजी यांच्याकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. पण, शर्थीचे प्रयत्न करूनही या संघाला ४३.८१ सेकंदाच्या वेळेसह पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नायजेरियाने ४२.१० सेकंदासह सुवर्ण, इंग्लंडने ४२.४१ सेकंदासह रौप्य व जमैकाने ४३.०८ सेकंदासह कांस्यपदक जिंकले.     

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाNeeraj Chopraनीरज चोप्राPakistanपाकिस्तान