शहरं
Join us  
Trending Stories
1
भुजबळ-जरांगे समर्थक आमने-सामने; महामार्गावरील वाहतूक रोखली, येवल्यात तणाव!
2
Ind vs Aus Women: भारताच्या आशा मावळल्या! ऑस्ट्रेलियाने 9 धावांनी केला पराभव
3
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?
4
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
6
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
7
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
8
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
9
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
10
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
11
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
12
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
13
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
14
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
15
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
16
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
17
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
18
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
19
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
20
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?

Commonwealth Games 2022 : सीमा पुनियाचे पाचवे राष्ट्रकुल पदक पटकावण्याचे स्वप्न भंगले; ३९ वर्षीय खेळाडूने पुरेपूर प्रयत्न केले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 2:19 AM

Commonwealth Games 2022 Women's Discus Throw Final : हरयाणाच्या ३९वर्षीय सीमाने यापूर्वी २००६, २०१४ व २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर २०१०मध्ये तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते

Commonwealth Games 2022 Women's Discus Throw Final : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार पदकं नावावर असलेल्या भारताच्या सीमा पुनिया ( Seema Punia) ला बर्मिंगहॅम येथे पदकाने हुलकावणी दिली. पाचवे राष्ट्रकुल स्पर्धेचे पदक जिंकण्याचे स्वप्न तिचे अपूर्ण राहिले. हरयाणाच्या ३९वर्षीय सीमाने यापूर्वी २००६, २०१४ व २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, तर २०१०मध्ये तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. आशियाई स्पर्धेत तिच्या नावावर २०१४ मध्ये सुवर्ण व २०१८ मध्ये कांस्यपदक आहे.

बर्मिंगहॅम येथे झालेल्या थाळी फेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सीमासह भारताची नवजीत कौर ढिल्लोन ही पण होती. सीमाने पहिल्या प्रयत्नात ५२.२८ मीटर लांब थाळी फेकली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तिने ५५.९३ मीटर लांब थाळी फेकून टॉप थ्रीमध्ये एन्ट्री मारली. नवजीतची कामगिरी पहिल्या तीन प्रयत्नांत ५०.९५, ५३.१४ व अपात्र अशी राहिली. नवनीत व सीमा या दोघींनी टॉप ८ मध्ये जागा पक्की केली. सीमाचा चौथा प्रयत्न अयशस्वी ठरला. नवनीतने चौथ्या व पाचव्या प्रयत्नांत अनुक्रमे ५२.२१ व ५२.४६ मीटर थाळीफेक केल्याने ती पदकाच्या शर्यतीतून बाद झाली.  सीमाचा पाचवा प्रयत्नही फेल गेला. सीमाने अखेरच्या प्रयत्नात ५३.८१ मीटर थाळी फेक केली, परंतु तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

#Weightlifting महिलांच्या ८७ किलो वजनी गटात उषा बन्नूर नतेश कुमार हिच्याकडून अपेक्षा होत्या आणि तिने स्नॅचमध्ये प्रयत्नात ९० किलो, दुसऱ्या प्रयत्नात ९५ किलो भार उचलून टॉप थ्रीमध्ये स्थान पक्के केले होते. ९८ किलो भार उचलण्याचा तिचा तिसरा प्रयत्न अयशस्वी ठरला. स्नॅच प्रकारात तिला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. क्लिन अँड जर्कमध्ये तिची खरी कसोटी होती. पहिल्याच प्रयत्नात तिने ११० किलो भार उचलला. पण, पुढील दोन प्रयत्नांत ११६ किलो उचल करण्यात ती अयशस्वी ठरली अन् पदक शर्यतीतून बाद झाली. 

  • राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक पदकं जिंकणारे खेळाडू - जस्पाल राणा ( नेमबाज) १५, सम्रेश जंग ( नेमबाज) १४, गगन नारंग ( नेमबाज) १० व शरथ कमल अचंथा ( टेबल टेनिसपटू) १०.  
  • भारताने मंगळवारी लॉन बॉल ( Lawn Bowls) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासातील भारताचे या क्रीडा प्रकारातील हे पहिलेच पदक ठरले. भारतीय महिलांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा विजय मिळवला. आफ्रिकेने २-८ अशा पिछाडीवरून १०-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु अखेरच्या फेरीत भारतीय महिलांनी सॉलिड खेळ केला.  आतापर्यंत १२ खेळांमध्ये भारताने किमान एकतरी गोल्ड जिंकले आहे. नेमबाजीत सर्वाधिक ६३ सुवर्ण भारताच्या खात्यात आहेत. त्यापाठोपाठ वेटलिफ्टिंग ( ४६), कुस्ती ( ४३), बॉक्सिंग ( ८) , बॅडमिंटन ( ७), टेबल टेनिस ( ६), अॅथलेटिक्स ( ५) , तिरंदाजी ( ३) , हॉकी, टेनिस, स्क्वॉश व लॉन बॉल ( प्रत्येकी १)  असा क्रम येतो. 

  • भारतीय महिला हॉकी संघाचा अ गटातील लढतीत इंग्लंडकडून १-३ असा पराभव #Hockey  
  • #CWG2022India भारताचा स्क्वॉशपटू सौरव घोषाल याला पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडच्या पॉल कोलकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला. आता त्याला कांस्यपदकाच्या लढतीत खेळावे लागेल
  • #Athletics भारताच्या दृती चंदला १०० मीटर शर्यतीच्या Heat मध्ये ११.५५ सेकंदाच्या वेळेसह चौथ्या स्थानावर समाधान  मानावे लागले आणि तिचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ