शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

Commonwealth Games 2022 : लॉन बॉलमध्ये भारताला आणखी एक पदक, महिलांपाठोपाठ पुरुष संघाने करून दाखवली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 7:13 PM

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली, त्यात आज आणखी पदकाची भर पडली.

Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली.  शनिवारी अॅथलेटिक्समध्ये अविनाश साबळे व प्रियांका गोस्वामी यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदक जिंकले, तर प्रियांकाने १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यक्रांती घडवली. विशेष म्हणजे या दोन्ही क्रीडा प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने प्रथमच पदक जिंकण्याचा मान पटकावला.

#Lawn Bowls महिलांनी लॉन बॉल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुरुष संघाच्या अंतिम फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग व दिनेश कुमार या भारतीय संघासमोर सुवर्णपदकासाठी नॉर्दन आयर्लंडचे आव्हान होते. चौथ्या फेरीपर्यंत भारतीय संघ ०-७ असा पिछाडीवर होता, परंतु पुढील दोन फेरींत दोन गुण घेत त्यांनी पिछाडी २-७ अशी कमी केली. सातव्या फेरीत आयर्लंडने ३ गुण घेताना आघाडी १०-२ अशी भक्कम केली. भारतीय खेळाडूंनी अखेरपर्यंत प्रयत्न केले, परंतु त्यांना ५-१८ अशा पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

CWG 2022: ज्या खेळात भारताच्या चौघींनी मिळवलं 'गोल्ड'; तो 'Lawn Bowls' हा खेळ कसा खेळतात माहीत आहे का?

  • #TableTennis अचंथा शरथ कमल व साथियन ज्ञानसेकरन या जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारतीय जोडीने ८-११, ११-९, १०-१२, ११-१,११-८ अशा फरकाने ऑस्ट्रेलियाच्या लम निकोलस व लू फिन यांचा पराभव केला.
  • #Badminton महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या पी व्ही सिंधूला संघर्ष करावा लागला. मलेशियाच्या जिन वेई गोहने पहिला गेम २१-१९ असा जिंकल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने २१-१४ अशा विजयासह पुनरागमन केले. तिसरा गेम कमालीचा चुरशीचा झाला, परंतु सिंधूने सातत्यपूर्ण खेळ करताना हा गेम २१-१८ असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. 
  • #Athletics महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. दृती चंद, हिमा दास, सराबनी नंदा व ज्योती याराजी यांनी ४४.४५ सेकंदासह हिटमध्ये दुसरे स्थान पटकावले.  
  • #Boxing भारताच्या नितू घंघासने ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने कॅनडाच्या प्रियांका ढिल्लॉनवर सहज विजय मिळवला. अमित पांघलनेही ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत झाम्बियनच्या पॅट्रीक चिनयेम्बावर ५-० असा एकहाती विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.  
  • #TableTennis अकुला श्रीजा व रिथ टेनिसन या जोडीने महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताना वेल्सच्या च्लोले अॅना व लारा विल्टन जोडीचा ११-७, ११-४, ११-३ असा पराभव केला. मनिका बात्र व दिया चितळे या जोडीनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी मॉरिशियसच्या ओमेहानी होसेनाली व नंदेश्वरी जलीम यांचा ११-५, ११-५, ११-३ असा पराभव केला.
  • #TableTennis अचंथा शरथ कमल याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या याँग आयझॅकचे आव्हान ११-६, ११-७, ११-४, ११-७ असा परतावून लावले. सनिल शेट्टीला इंग्लंडच्या लिएम पिचफोर्डकडून ११-९, ६-११, ८-११, ८-११, ४-११ असा पराभव पत्करावा लागला. साथियन ज्ञानसेकरन याने चुरशीच्या सामन्यात इंग्लंडच्या सॅम वॉकरवर ११-५, ११-७, ११-५, ८-११, १०-१२, ११-९ असा ४-२ विजय मिळवला. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत श्रीजा अकुलाला ३-४ अशा फरकाने सिंगापूरच्या तिनवेई फेंगकडून हार मानावी लागली. 
टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ