Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली. शनिवारी अॅथलेटिक्समध्ये अविनाश साबळे व प्रियांका गोस्वामी यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्यपदक जिंकले, तर प्रियांकाने १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यक्रांती घडवली. विशेष म्हणजे या दोन्ही क्रीडा प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने प्रथमच पदक जिंकण्याचा मान पटकावला. लॉन बॉलमध्येही भारताच्या पुरुष संघाने रौप्यपदक जिंकले.
cr५० किलो वजनी गटाच्या कांस्यपदकाच्या लढतीत पूजा गेहलोत व स्कॉटलंडच्या ख्रिस्टली लेमोफॅक यांच्यात लढत होती. स्कॉटलंडच्या खेळाडूने प्रथम दोन गुण घेतले. पण, पूजाने एक डाव टाकला अन् स्कॉटलंडच्या खेळाडूला चारवेळा गिरकी घेण्यास भाग पाडून ८-२ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पुजाने लेक अटॅक करून आणखी ४ गुण घेत ही लढत १२-२ अशी जिंकली. २०१९च्या २३ वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या पूजाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी कुस्तीतीत आजचे दुसरे कांस्यपदक निश्चित केले.