गोल्ड कोस्ट : आॅलिम्पिक कांस्यविजेता गगन नारंग याने गुरुवारी राष्टÑकुल नेमबाजीत पुरुषांच्या ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक, तर मूळचा कोल्हापूरचा असलेल्या स्वप्निल कुसाळेने कांस्यपदक जिंकले. दुसरीकडे भारतीय संघात पुनरागमन करणारी अन्नूराज सिंग हिने २५ मीटर पिस्तूल प्रकाराचे कांस्य पटकविले. पहिल्या दोन दिवसांत दोन सुवर्णांसह पाच पदकांची कमाई करणाºया भारतीय खेळाडूंनी आज आणखी दोन पदकांची भर घातली.२०१० च्या राष्टÑकुलचे सुवर्ण जिंकणाºया नारंगने पात्रता फेरीत चौथे स्थान घेतले. अंतिम फेरीत २४६.३ गुणांची कमाई केली. सुवर्ण विजेत्याच्या तुलनेत तो १.४ गुणांनी माघारला. दुसरीकडे भारताच्या स्वप्निल कुसाळेने पात्रता फेरीत ६१९.१ गुणांचे लक्ष्य साधले. अंतिम फेरी फेरीत त्याने २२५.६ गुण, तर सुवर्णपदक जिंकणाºया आॅस्ट्रेलियाच्या डेन सॅम्पसनने अंतिम फेरीत २४७.७ गुण संपादन केले. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात अन्नूराजला कांस्य मिळाले, तर सुवर्ण आणि रौप्य पदके आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जिंकली. या प्रकारात हिना पंडित-सिद्धूला २१ गुणांसह पाचव्या तर राही सरनोबतला १७ गुणांसह सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.गगन स्पर्धा संपल्यांनतर म्हणाला, वेगवान वारे वाहत होते. माझ्या संयमाची कसोटी होती. पुढील वर्षीच्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. भारताच्या स्वप्नील कुसाळे याने याच स्पर्धेचे कांस्य जिंकले. सुवर्ण यजमान आॅस्ट्रेलियाच्या नेमबाजाने जिंकले. (वृत्तसंस्था)
राष्ट्रकुल नेमबाजी : नारंगला रौप्य, स्वप्निल, अन्नू राजला कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 3:16 AM