ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - टी-२0 क्रिकेट गेल्या एका दशकात बदलाच्या परिक्रमेतून जात आहे. यादरम्यान कौशल्याच्या दृष्टिकोनातून गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांत जास्त सुधारणा पाहायला मिळाली असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.द्रविडने म्हटले, टी-२0 क्रिकेटमध्ये गेल्या ९, १0 अथवा ११ वर्षांत कौशल्याच्या दृष्टीने गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाज थोडे अग्रेसर आहेत; परंतु गोलंदाजही हळूहळू त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे असे आपण आपल्या अनुभवाने सांगू शकतो.याविषयी विस्ताराने सांगताना द्रविडने खेळाच्या विकासाबरोबरच गोलंदाजांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले. तो म्हणाला, गोलंदाजांत काही शारीरिक मर्यादा असतात. तुम्ही मोठ्या कालावधीपर्यंत गोलंदाजी करू शकत नाहीत. तुम्ही प्रत्येक दिवशी दोन तास, अडीच तास अथवा तीन तास गोलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जखमी होऊ शकतात किंवा कोणत्याही वेळेस तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या पाहिले गेल्यास गोलंदाजांना आपल्या कौशल्यावर काम करण्यासाठी मर्यादित संधी असते. दुसरीकडे फलंदाज याविषयी थोडे फायदेशीर आहेत. कारण गोलंदाजांच्या तुलनेत ते जास्त वेळ सराव करू शकतात.ह्ण टी-२0 क्रिकेटमध्ये बॅट आणि चेंडूदरम्यान संतुलन बनवणे आवश्यक असल्याचेही द्रविड म्हणतो. तो म्हणाला, ह्यटी-२0 क्रिकेटचे महत्त्व वाढतच जाईल. आम्हाला फलंदाज आणि चेंडूतील संतुलन बनवण्यासाठी थोडे सावध असण्याची गरज आहे. मी टी-२0 क्रिकेट हे एक मोठे आव्हानाच्या रूपात पाहता आहे.
टी-२0 मध्ये गोलंदाजांच्या तुलनेत फलंदाजांत अधिक सुधारणा : द्रविड
By admin | Published: July 15, 2016 9:13 PM