शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चीनच्या तुलनेत आम्ही मागेच

By admin | Published: July 01, 2017 2:01 AM

बॅडमिंटनमध्ये भारत चीनच्या तुलनेत अद्याप बराच मागे असून या खेळात सुपरपॉवर बनण्यासाठी पायाभूत सुविधा आणि प्रशासनात आमूलाग्र परिवर्तनाची गरज असल्याचे मत

नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये भारत चीनच्या तुलनेत अद्याप बराच मागे असून या खेळात सुपरपॉवर बनण्यासाठी पायाभूत सुविधा आणि प्रशासनात आमूलाग्र परिवर्तनाची गरज असल्याचे मत राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गोपीचंद यांनी व्यक्त केले आहे.गोपीचंद म्हणाले, ‘माझ्यामते आम्ही चीनच्या तुलनेत बरेच मागे आहोत. खरेतर चीनच्या खेळाडूंसोबत तुलना करणे हा आमच्या खेळाडूंवर अन्याय ठरेल. आमचे खेळाडू टप्याटप्यात चांगली कामगिरी करतात. विश्व चॅम्पियनशिप, आॅलिम्पिक आणि आॅल इंग्लंड अशा स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीची गरज आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर अशा स्पर्धा जिंकणे शक्य आहे.’आमच्याकडे आमचे खेळाडू तर सरस कामगिरी करतात पण कोच, सहयोगी स्टाफ आणि मॅनेजर सर्वोत्कृष्ट दर्जाचे नाहीत, असे माजी आॅल इंग्लंड चॅम्पियन गोपीचंद यांचे मत आहे. किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वाखालील भारतीय बॅडमिंटनपटूंनी अलीकडे देदीप्यमान कामगिरी केली. महिला आणि पुरुषांच्या गेल्या सहापैकी चार सुपर सिरिज स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी बाजी मारली. पी.व्ही. सिंधूने इंडिया ओपनचे जेतेपद पटकविल्यानंतर प्रणितने सिंगापूर ओपनचा स्वत:चा पहिला सुपरसिरिज किताब जिंकला. त्यानंतर श्रीकांतने इंडोनेशियन आणि आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सलगपणे चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.गोपीचंद यांनी स्थानिक स्पर्धांचा स्तर आणि ढिसाळ प्रशासन यावर टीका केली. ते म्हणाले,‘आमच्या स्थानिक स्पर्धांचा स्तर आणि प्रशासन दर्जेदार नाही. आमच्याकडे अद्यापही १९९१ सारख्याच स्पर्धांचे आयोजन होते. गेल्या २५ वर्षांपासून साचेबद्ध व्यवस्थेत आम्ही काम करीत आहोत. राष्ट्रीय चॅम्पियनशिप, रँकिंग राबविताना साचेबद्ध विचारांमुळे गेली २५ वर्षे आम्ही एकसारखे कोच तयार करीत आहोत.’ (वृत्तसंस्था)