शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

गुणतालिका पूर्णपणे बदलण्याची शक्यता

By admin | Published: April 23, 2016 4:08 AM

आयपीएलच्या नवव्या पर्वातील या टप्प्यात स्पर्धेचा सर्वदृष्टीने विचार करू. जवळजवळ गेल्या पंधरवाड्यात स्पर्धेत काय घडले.

रवी शास्त्री - आयपीएलच्या नवव्या पर्वातील या टप्प्यात स्पर्धेचा सर्वदृष्टीने विचार करू. जवळजवळ गेल्या पंधरवाड्यात स्पर्धेत काय घडले. काही संघांनी बरेच काही कमावले तर काही संघांनी बरेच काही गमावल्याचे चित्र आहे. काही संघ आपल्या लक्ष्यापासून भरकटले जाण्याची शक्यता आहे. ज्या खेळाडूंबाबत अधिक चर्चा होत नाही, त्या खेळाडूंबाबत विचार करू. युवराज सिंग कधी परतणार किंवा आशीष नेहराचे काही वृत्त. सुनील नारायणला पुन्हा केकेआरतर्फे खेळताना बघत आहोत पण, सॅम्युअल बद्रीबाबत काय म्हणता येईल. या मोसमात तो आरसीबीतर्फे खेळू शकेल, असे वाटत नाही. मुंबई इंडियन्सतर्फे किरोन पोलार्डने योग्यवेळी आपली छाप सोडली तर रॉयल चॅलेंजर्सचा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेल मायदेशी परतला. गेल्या लढतीत गुजरात लायन्सतर्फे डेल स्टेनला खेळताना बघितले, पण ड्वेन स्मिथ अद्याप गुजराततर्फे प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र अहे. लसिथ मलिंगा व लेंडल सिमन्सची उणीव त्यांचा संघाला भासणार आहे. डॅरेन सॅमी व अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज यांना यावेळी लिलावामध्ये एकाही फ्रॅन्चायझीने करारबद्ध केले नाही. हैदराबाद व गुजरात संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत सुरेश रैना व शिखर धवन यांना सूर गवसल्याचे संकेत मिळाले. हे दोन्ही खेळाडू दिग्गज आहे. कृणाल नावाच्या आणखी एका पंड्याने आपली छाप सोडली. मुरुगन केवळ एकटा अश्विन नसल्याचे आपल्या निदर्शनास आले. कोहली, गेल, डिव्हिलियर्स आणि वॉटसन यांच्यासारख्या स्टार्सदरम्यान सरफराजलाही छाप सोडताना आपण अनुभवले. दिल्लीच्या संघावर प्रत्येक दिवशी राहुल द्रविडची छाप आणखी गडद होत असल्याचे दिसून येत आहे. या संघाची धुरा अशा खांद्यावर आहे की जे युवा खेळाडूंना दिग्गज बनविण्यास समर्थ आहेत.मुंबई संघाने नेहमीप्रमाणे संथ सुरुवात केली. मुंबई संघ वॉर्मअप करीत असल्याचे भासत आहे. ‘धोनी अ‍ॅण्ड कंपनी’ योग्य संतुलन साधण्यास प्रयत्नशील आहे. केकेआरबाबत काय सांगता येईल. सध्या सर्वकाही ‘आॅलवेल’ आहे. हे सर्व असले तरी हे स्पर्धेचे सुरुवातीचे दिवस आहेत, हे विसरता येणार नाही. गुणतालिका पूर्णपणे बदलू शकते. सामने होणाऱ्या नव्या स्थळांची लवकरच माहिती मिळणार आहे. आयपीएल-२०१६ काही वेळेसाठी ‘डॅमेज कंट्रोल मोड’मध्ये दिसत आहे. (टीसीएम)