शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
3
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
4
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
5
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
6
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
7
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
8
“चारवेळा CM असताना शरद पवारांना आरक्षणाचा मुद्दा का आठवला नाही”; शिंदे गटातील नेत्याचा सवाल
9
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
10
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
11
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
12
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
14
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
15
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
16
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
17
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
18
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
19
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
20
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश

पाहुण्या संघाचा आत्मविश्वास बळावला

By admin | Published: October 23, 2016 3:17 AM

अखेर पाहुण्या संघाला जल्लोषाची संधी मिळाली. दिल्लीतील सामन्यात निसटता का होईना, पण विजय मिळाल्याने न्यूझीलंड संघाने पार्टी केली असेल. त्यांचा कर्णधार केन

- सुनील गावसकर लिहितो़अखेर पाहुण्या संघाला जल्लोषाची संधी मिळाली. दिल्लीतील सामन्यात निसटता का होईना, पण विजय मिळाल्याने न्यूझीलंड संघाने पार्टी केली असेल. त्यांचा कर्णधार केन विलियम्सन हा या विजयाचा खरा हिरो म्हणावा लागेल. त्याने फिरोजशाह कोटला मैदानावर प्रेक्षणीय फलंदाजी केली. त्याची फलंदाजी कोहलीच्या फलंदाजी- सारखी तंत्रशुद्ध होती. त्यात दुर्बिणीने पाहिले तरी उणिवा सापडणार नाहीत इतकी. टॉम लॅथमने त्याला चांगली साथ दिली. लॅथमने आपल्या तंत्राने आणि संयमाने सर्वांना प्रभावित केले आहे. पाहुण्या संघात अनेक दिग्गज नावे आहेत, त्यांनी आता आपल्या नावाला साजेशी कामगिरी करण्याची वेळ आली आहे. हा विजय निसटता असला तरी या विजयामुळे भारतीय संघ मायदेशात ‘अपराजित’ नाही असा आत्मविश्वास पाहुण्या संघाला गवसला आहे, ते महत्त्वाचे.सामना जरी न्यूझीलंडने जिंकला असला तरी भारतीय गोलंदाजांचे कौतुक करावेच लागेल. कारण ज्यावेळी लॅथम आणि विलियम्सन हे खेळत होते. त्यावेळी हा संघ ३00 पार धावा करणार असे वाटत होते; परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना अडीचशेच्या आत रोखून भारतीय संघाला संधी निर्माण करून दिली. भारतीय संघ पुन्हा एकदा चांगली सुरुवात करण्यास अपयशी ठरला. समोरच्या दिशेने खणखणीत षट्कार ठोकल्यानंतर रोहितचे बाद होणे आणि साउथीच्या बाउन्सरला तितक्याच ताकदीने फटकावणारा रहाणे लवकर बाद होणे भारतासाठी दु:चिन्ह ठरले. विराट कोहलीला त्याच्या घरच्या प्रेक्षकांना खूश करता आले नाही, लाजवाब कव्हर ड्राईव्ह ठोकणारा कोहली ज्या पद्धतीने बाद झाला ते क्रिकेटमध्ये दुर्दैवी समजले जाते. स्ट्रेट ड्राईव्हवर नॉनस्ट्रायकरवरील फलंदाज धावचित होण्यासारखेच हे दुर्दैवी आहे. केदार जाधव आणि धोनी यांच्यातील फुलणारी भागीदारी मोडल्याने भारताची विजयाकडील वाटचाल मंदावली. टीम साउथीने धोनीचा अप्रतिम परतीचा झेल टिपला आणि भारताच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आल्या. अक्षर पटेलला अष्टपैलू फलंदाज म्हणून आपली गुणवत्ता अजून सिद्ध करता आलेली नाही. हार्दिक पांड्याने निकराने केलेला प्रयत्न यशस्वी ठरला असता तर पार्टी करण्याचा योग भारतीय संघाच्या वाट्याला आला असता, पण पाहुण्या संघाने हा योग हिसकावून घेतला.मोहालीची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगल्या रीतीने येत असल्याने येथे धावांचा पाऊस पडू शकतो. पाहुणा संघ आतापर्यंतची आपली कामगिरी मागे टाकून भरारी घेण्याचा प्रयत्न करेल. (पीएमजी)