हरीष गुप्ता, नवी दिल्लीबीसीसीआयमध्ये होत असलेल्या घडामोडींपासून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चार हात लांबच राहणे पसंत केले आहे. मात्र असे असले तरी राजीव शुक्ला आणि जोर्तिरादित्य शिंदे यांच्या इंडियन प्रिमियर लिगमधील निवडीपाठीमागे असेलेल्या त्यांचा छुपा पाठिंबा आता लपून राहिलेला नाही.मागील महिण्यात जेटली यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शुक्ला- शिंदे यांच्या पराभवाचा बदला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी श्रीनिवासन यांना त्यांच्या कृत्यासाठी धडा शिकवला जावा असाही आग्रह धरला होता. जेटली यांनी त्यांचे विश्वासु बीसीसीआचे सदस्य ,खासदार अनुराग ठाकूर यांना यातील पळवाटा शोधून त्या बंद करण्यास सांगितले. दरम्यान जेटली यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधून या योजनेला अंतिम रुप दिले.या सर्व प्रकरणात शरद पवार यांचे विश्वासु चेतन देसाई,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के व शशांक मनोहर यांचा मुलगा यांनी महत्वाची भुमिका पार पाडली.जेव्हा शुक्ला व शिंदे यांचा पराभव झाला होता तेंव्हा ‘कॉँग्रेस मुक्त बीसीसीआय’ असे म्हटले गेले होते. कारण कॉँग्रेस एकाही नेत्याला बीसीसीआयच्या निवडणूकीत यश मिळाले नव्हते. राजीव शुक्ला हे प्रियांका गांधी व जोर्तिरादित्य हे कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निकवर्तियांमधील असल्याने हा सोनिया गांधी यांचा पराभव मानला जात होता. मात्र या घडामोडी जवळून पाहणाऱ्यांनी सांगितले की जगमोहन दालमिया व अनुराग ठाकूर यांचा विजय जेटली यांनी साजरा केला नव्हता. शुक्ला व जोर्तिरादित्य हे जेटली यांचे निकटचे मित्र असल्यामुळे त्यांना बीसीसीआयमध्ये स्थान असावे असे जेटली यांना वाटत होते. शुक्ला यांनी २०१३ च्या आयपीएल अध्यक्षपदाची सुत्रे मध्येच सोडत श्रीनिवासन यांना धक्का दिला होता. तसेच श्रीनिवासने जावई व सामना निश्चितीवर त्यांनी जोरदार टीका केली होती. यासर्व गोष्टींमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र शिंदे यांच्या पराभवाला कोणतेही कारण नव्हते. हा पराभवच आता श्रीनिवासन यांच्या पायात अडथळा बनत आहे.
क्रिकेटच्या मैदानावर कॉँग्रेसचे पुनरागमन
By admin | Published: April 07, 2015 11:32 PM