शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचा एल्गार

By admin | Published: July 17, 2015 3:20 AM

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या ....

- विश्वास चरणकर,  कोल्हापूरबुद्धिबळ... नावातच या खेळाचे बळ कळते. ज्याच्या बुद्धीत बळ आहे, त्यानेच हा खेळ खेळावा. तासन्तास मन एकाग्र करून प्रतिस्पर्ध्याच्या मनातील चालीचा ठाव घ्यायचा आणि त्याला कोंडीत पकडायचा यासाठी लागते असामान्य बुद्धिमत्ता. त्यामुळे बहुतांश लोक या खेळापासून अंतर राखून असतात. समाजातील ठराविक वर्गाची मक्तेदारी बनलेला हा खेळ घरोघरी पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविते आहे,- ‘चेस इन स्कूल’. राज्यातील पाचशे शाळांमधून सध्या हा प्रकल्प राबविला जात आहे. ‘फिडे’ अर्थात जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळावर प्रेम करणारे अनेक जण या यज्ञात योगदान देत आहेत. भविष्यात चांगले बुद्धिबळपटू तयार करायचे असतील, तर त्यांना लहान वयातच या खेळाची गोडी लावावी लागेल, ही गोष्ट हेरून शाळांना यात सहभागी करून घेतले जाते. यासाठी शाळांना आव्हान केले जाते. काही शाळा स्वत:हून सहभागी होतात, तर काहीपर्यंत पोहोचावे लागते. सात ते अकरा हे बुद्धिबळ शिकण्यास सुरुवात करण्याचे ‘आयडीयल’ वय आहे, असे ‘फिडे’चे प्रमाण आहे. या गटाला ‘लक्ष्य’ करीत सहभागी शाळेतील तिसरीच्या मुलांना बुद्धिबळाचे धडे दिले जातात. याचा फिडेने अभ्यासक्रमही तयार केला आहे. वर्षभरात सुमारे ३२ तासिका घेतल्या जातात. यातून मुलांना बुद्धिबळाची तोंडओळख घडवून आणली जाते. त्यांना चाली शिकविल्या जातात, खेळाची गोडी लावली जात असून, त्यांची एकाग्रता वाढविली जाते. वर्षाच्या अखेरीस ज्यांच्यामध्ये ‘स्पार्क’ दिसतो अशा निवडक मुलांच्या पालकांशी संपर्क करून त्यांना याची कल्पना दिली जाते. मुलांचा ‘कल’ समजल्यावर अनेक पालक त्यांना व्यावसायिक अ‍ॅकॅडमीकडे घेऊन जातात. तेथून मग सुरू होते, एका नव्या ग्रॅण्डमास्टरची जडणघडण. हाच या प्रकल्पाचा उद्देश आहे.महाराष्ट्रात या प्रकल्पाची सुरुवात चार वर्षांपूर्वी झाली. सिम्बायोसिसच्या मदतीने ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी हा प्रकल्प सुरुवातीला राबविला. तेच या प्रकल्पाचे कमिशनर होते. सध्या सांगलीचे गिरीश चितळे हे कमिशनर आहेत. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने यासाठी प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक नेमले आहेत. समन्वयकांच्या मदतीने शाळांना यात सहभागी करून घेतले जाते. यासाठी संघटनेने प्रशिक्षकही नेमले आहेत. एक प्रशिक्षक दहा शाळांमध्ये प्रशिक्षण देतो. या प्रशिक्षकासही अगोदर प्रशिक्षण दिलेले असते. गेल्या मे महिन्यात हे प्रशिक्षण देण्यात आले होते. अल्प मोबदला घेऊन हे प्रशिक्षक काम करीत आहेत. या खेळाचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून सुरू केलेल्या या यज्ञाला खर्चाची बाजूही आहे. प्रकल्पात सहभागी शाळांना सुरुवातीला एक कीट दिले जाते. यामध्ये मॅग्नेटिक बोर्ड, पट, सोंगट्या, पुस्तके यांचा समावेश असतो. यासाठी शाळांकडून पाच हजार रुपये घेण्यात येतात; पण ज्या शाळांची ही कुवत नाही त्यांना स्थानिक प्रायोजकांमार्फत मदत केली जाते. चितळे डेअरीमार्फतही याला आर्थिक हातभार लावण्यात येत आहे. या सर्व प्रकल्पाची माहिती डिजिटल स्वरूपात ठेवली जाते. कोणालाही ती ँ३३स्र://६६६.ूँी२२्रल्ल२ूँङ्मङ्म’.्रल्ल या वेबसाईटवर आॅनलाईन पाहता येते. यात सहभागी शाळांना आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. शिक्षणात बुद्धिबळाचा समावेश करा, अशी अनेक वर्षांची मागणी आहे. हा निर्णय केव्हा होईल हे माहीत नाही; पण ‘चेस इन स्कूल’ हा प्रकल्प यशस्वी झाला, तर घरोघरी विश्वनाथन आनंद तयार व्हायला वेळ लागणार नाही.लहान मुलांना बुद्धिबळाची गोडी लावली, तर भविष्यात या देशांत अनेक विश्वनाथन आनंद तयार होतील, असे गुरुवर्य भाऊसाहेब पडसलगीकर (सांगली) म्हणायचे. ‘फिडे’चे हेच धोरण आहे. त्यानुसार आम्ही हा प्रकल्प राबवीत आहोत. या प्रकल्पाबाबत शाळांमध्ये आता उत्सुकता वाढत आहे. शाळा स्वत:हून संपर्ककरीत आहेत. हे भारतीय बुद्धिबळ क्षेत्राच्या दृष्टीने सुचिन्ह आहे. यातून उद्याचे अनेक वर्ल्डचॅम्पियन घडतील, अशी आशा आहे.- गिरीश चितळे, कमिशनर, चेस इन स्कूल प्रकल्प