इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुक याने आज येथे कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करतानाच अनेक विक्रम आपल्या नावावर केले. त्यात १० हजार धावा कमी वयात करण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे.चेस्टर ली स्ट्रीट : इंग्लंडचा संघ जेव्हा श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना उतरला तेव्हा कुकला १0 हजार धावा पूर्ण करण्यासाठी फक्त ५ धावांची गरज होती. त्याने डावाच्या दुसऱ्याच षटकात नवुन प्रदीपला चौकार मारत ही कामगिरी केली. तो कसोटी क्रिकेटमध्ये १0 हजार धावा करणारा जगातील १२ वा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज आहे.कुक अद्याप ३१ वर्षे १५७ दिवसांचा आहे आणि अशा प्रकारे त्याने सर्वांत कमी वयात १0 हजार धावा पूर्ण करण्याचा नवीन विक्रम केला. याआधी विक्रम तेंडुलकरच्या नावावर होता. सचिनने ही कामगिरी ३१ वर्षे ३२६ दिवसांत केली होती. विशेष म्हणजे सर्वांत कमी वयात ७ हजार, ८ हजार, ९ हजार आणि आता १0 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रमही कुकच्या नावावर नोंदवला गेला. तथापि, तेंडुलकरने १९५ डावांत ही कामगिरी केली होती. हा विक्रम सचिन तेंडुलकरसह ब्रायन लारा आणि कुमार संगकारा यांच्या नावावर संयुक्तरीत्या आहे. कुकला १0 हजार धावा पूर्ण करण्यासाठी २२९ वा डाव खेळावा लागला. एवढेच नव्हे, तर १0 हजार धावांपर्यंत पोहोचण्यासाठीही कुकने कमी वेळ घेतला. भारताविरुद्ध २00६ मध्ये कसोटी कारकीर्दीस सुरुवात करणाऱ्या या फलंदाजाने ३७४३ दिवसांत ही किमया केली. त्याने अन्य एक भारतीय राहुल द्रविडचा विक्रम मोडला. द्रविड ४२९८ दिवसांत १0 हजार धावा करणारा फलंदाज ठरला होता. आतापर्यंत ज्या फलंदाजांनी कसोटी सामन्यात १0 हजार पूर्ण केल्या आहेत त्यात भारत आणि आॅस्ट्रेलियाचे प्रत्येकी ३, विंडिज व श्रीलंकेचे प्रत्येकी २ फलंदाज आहेत, तसेच द. आफ्रिका आणि इंग्लंडचा प्रत्येकी १ फलंदाज आहे.कसोटीत १0 हजारांपेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज :सचिन तेंडुलकर (१५,९२१ धावा),रिकी पाँटिंग (१३,३७८ धावा),जॅक कॅलिस (१३२८९),राहुल द्रविड (१३,२८८ धावा), कुमार संगकारा (१२,४00 धावा), ब्रायन लारा (११,९५३ धावा), चंद्रपॉल (११,८६७ धावा), माहेला जयवर्धने (११,८१४ धावा), अॅलन बॉर्डर (११,१७४ धावा), स्टीव्ह वॉ (१0,९२७ धावा),सुनील गावस्कर (१0,१२२ धावा),अॅलेस्टर कुक (१0,0१८ धावा). हे सर्व रेकॉर्ड इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या चहापानापर्यंत आहे.
कुक @ 10000
By admin | Published: May 31, 2016 3:39 AM