शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

कोरोना, लॉकडाऊन, बहिष्काराच्या सावटात हिवाळी ऑलिम्पिक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 10:07 AM

जगाला कोरोना भेट देणाऱ्या चीनच्या बीजिंग शहरात शुक्रवारी लॉकडाऊन तसेच अनेक देशांचा बहिष्काराचा सामना करीत हिवाळी ऑलिम्पिकला दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात झाली.  

बीजिंग : जगाला कोरोना भेट देणाऱ्या चीनच्या बीजिंग शहरात शुक्रवारी लॉकडाऊन तसेच अनेक देशांचा बहिष्काराचा सामना करीत हिवाळी ऑलिम्पिकला दिमाखदार सोहळ्याद्वारे सुरुवात झाली.  अनेक देशांच्या राजकीय बहिष्कारानंतरही चीनने गर्वाने ताकदीचे दर्शन घडविले. चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थाॅमस बाक यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्टेडियममध्ये (बर्ड नेस्ट) उद्घाटन सोहळा झाला. २००८ ला याच ठिकाणी ऑलिम्पिक पार पडले होते. उद्घाटनासोबतच बीजिंग हे शहर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिकचे एकाच ठिकाणी आयोजन करणारे जगातील पहिले शहर बनले. टोकियो ऑलिम्पिकपाठोपाठ कोरोना सावटात सहा महिन्यांत हे दुसरे ऑलिम्पिक आहे.अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांच्या विरोधानंतरही जगातील अनेक नेत्यांनी उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. त्यात रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. समारंभाआधी पुतिन आणि जीनपिंग यांच्यात चर्चा देखील झाली. गलवान खोऱ्यातील संघर्षात सामील असलेल्या सैन्यातील कमांडरला चीनने ध्वजधारक बनविल्याने भारताने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. कार्यक्रमात विविध नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, लाईट ॲन्ड साऊंड शो, आतषबाजी आणि चीनच्या संस्कृतीशी संबंधित झलक सादर करण्यात आली. 

आरिफ खानने केले भारताचे नेतृत्वउद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व स्कीअर आरिफ खान याने केले. भारताचे राजदूत मात्र कार्यक्रमात अनुपस्थित होते. ३१ वर्षांचा आरिफ स्पर्धेत सहभागी एकमेव भारतीय खेळाडू आहे. आरिफने  स्लालोम आणि जायंट स्लालोम प्रकारात पात्रता गाठली आहे.  सोबत एक कोच, तांत्रिक अधिकारी आणि संघ व्यवस्थापक आहेत. आरिफच्या स्पर्धा १३ आणि १६ फेब्रुवारी रोजी होतील. भारतीय पथक २३ व्या स्थानावर स्टेडियममध्ये दाखल झाले. काश्मीरच्या बारामुल्ला येथे आरिफ वयाच्या १२ व्या वर्षांपासून या खेळात आहे. २०११ च्या द. आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेत त्याने दोन सुवर्णपदके जिंकली होती.

टॅग्स :chinaचीन