कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सुरुवातीला हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत होता, परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 3 मे पर्यंत तो वाढवण्यात आला. लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी, भाविक अन्य राज्यांमध्ये अडकले आहेत. राज्य सरकार त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यात आता महाराष्ट्राच्या गिर्यारोहक दार्जिलिंगमध्ये अडकले असल्याचे समजते आहे.
''1 मार्चपासून आम्ही दार्जिलिंगमध्ये आलेलो आहेत. त्यावेळी लॉकडाऊन होईल, याबद्दल काही चिन्ह नव्हती. आम्ही दहा विद्यार्थी आहोत. गिर्यारोहक असल्यामुळे कोणाच्याही आरोग्याचा प्रश्न अद्यापतरी उद्भवलेला नाही. आता जवळपास दोन महिने झाले आहेत आम्ही इथेच आहोत. त्यामुळे आता सर्वांनाच घरी परतण्याची ओढ लागली आहे. 3 मे नंतरही जर लॉकडाऊन वाढणार असेल, तर कृपया आम्हाला राज्यात आणण्याची सोय करावी,'' अशी विनंती या गिर्यारोहकांनी केली आहे.
दार्जिलिंग येथे अडकलेले महाराष्ट्राचे गिर्यारोहक1. नितेश शिंदे - मुंबई2. शशी कुमार - मुंबई3. आशिष चव्हाण - मुंबई4. चैतन्य राव - मुंबई5. निशांत परेरा - मुंबई6. अजित आर. - नागपूर7. आदित्य शुक्ला - नागपूर8. दीपिका करांडे - पुणे9. दीपक कनोजिया - मुंबई10. सुशांत अनवेकर - मुंबई