- अयाझ मेमन बीसीसीआयने शुक्रवारी अत्यंत महत्त्वाची असलेली आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित केल्याची घोषणा केली आहे. कोविड-१९ या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जगभरात या विषाणूचा फैलाव आणि त्याचे परिणाम यामुळे सर्वच खेळांच्या स्पर्धांना फटका बसला आहे. त्यात आयपीएल कसा अपवाद असू शकेल.आंतरराष्ट्रीय स्पोर्टस् कॅलेंडरकडे पाहता या विषाणूमुळे किती नुकसान होऊ शकते हे लक्षात येते. अमेरिकेमध्ये याबाबत उशिराने प्रतिक्रिया समोर आली. एनबीए (बास्केटबॉल) एनएचएल (हॉकी) एमएलबी(बास्केटबॉल), एनसीएए (कॉलेज अॅथलेटिक्स) या स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहे. तर पीजीए (गोल्फ) तीन आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे.युरोपातील प्रमुख फुटबॉल स्पर्धा ला लिगा, स्पेन इटलीची सी ए, पोर्तुगालची प्राईमरा लीग, लीग ऑफ आर्यलंड या स्थगित करण्यात आलेल्या प्रमुख स्पर्धा आहेत. प्रीमियर लीगने सुरुवातीला जाहीर केले की, स्थगित केली जाईल.चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांच्या सर्वच क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड पिक्सला काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आली. एटीपी स्पर्धा सहा, तर डब्लुटीए टेनिस स्पर्धा पाच आठवड्यांसाठी स्थगित करण्यात आल्या आहेत.काही लीग आणि फुटबॉल सामने हे बंद दाराच्या आड सुरू आहेत; पण येथील परिस्थितीही बदलू शकते. केन रिचर्डसन आणि लॉकी फर्ग्युसन यांनी फ्लूसारखी लक्षणे असल्याचे सांगितल्यावर क्रिकेट प्रशासन गंभीर झाले होते. इंग्लंडने त्यांचा श्रीलंका दौरा पुढे ढकलला आहे.आयपीएल अजूनही धोक्यातच आहे. मात्र, बीसीसीआयने या लीगला स्थगित केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला स्थगित करण्याचा निर्णय अपरिहार्य होता. परराष्ट्र मंत्रालयाने अंतिम निर्णय बीसीसीआयकडे ठेवून स्पर्धा स्थगित करण्याचा सल्ला दिला आहे.आयपीएलचे अनेक आर्थिक पैलूदेखील आहेत. एक अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय आहे. प्रत्येकाचे हित बघूनच अंतिम निर्णय घ्यावा लागेल. भारताचे खेळाडू जर उच्च जोखमीच्या देशातून आल्यास त्यांना व्हिसा देण्यात येणार नाही. स्पर्धा अडचणीत येणे हे दुर्दैवी आहे.
Coronavirus : क्रीडा स्पर्धांवर संकट येणे दुर्दैवी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 3:03 AM