दोहा : कोरोना विषाणूने संपूर्ण क्रीडाविश्वावर आपला विळखा घातला असून आता फिफा विश्वचषक स्पर्धेवरही कोरोनाचे सावट दिसून येत आहे. कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेला माजी फुटबॉलटू आदिल खामिस (५४) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. स्पर्धेच्या आयोजन समितीने गुरुवारी ही माहिती दिली.याआधी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या ३ स्टेडियमच्या ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीनंतरही फिफा विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची कामे अद्यापही सुरू आहेत. ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ साली होणार आहे. आदिल कतारचा स्टार फुटबॉलपटू असून, त्याने आपल्या राष्ट्रीय संघाकडून छाप पाडली आहे. वयाच्या १८व्या वर्षीच त्याने कतारकडून आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. १९८३ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या आदिलने २००० साली निवृत्ती घेतली होती. सुदानविरुद्ध त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
CoronaVirus News: फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या ब्रँड अॅम्बेसेडर कोरोनाग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 4:11 AM