शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

coronavirus: कोरोनापासून खेळाडूंचा बचाव करावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 4:27 AM

एक योजना आखण्यात येत आहे. जर अव्वल खेळाडूला काही झाले तर मोठा धक्का बसेल. त्यामुळे आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल.

नवी दिल्ली : भारताच्या मुख्य केंद्रांमध्ये आऊटडोअर सरावाला सुरुवात करण्याची योजना तयार करण्यात असून क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटले की, खेळाडूंना कोविड-१९ व्हायरसची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.रिजिजू म्हणाले,‘एक योजना आखण्यात येत आहे. जर अव्वल खेळाडूला काही झाले तर मोठा धक्का बसेल. त्यामुळे आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. सध्यातरी खेळाडूंपैकी कुणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. खेळाडू आपल्या देशाचा गौरव आहेत आणि कुठलीही जोखिम पत्करू शकत नाही.’रिजिजू पुढे म्हणाले,‘सर्व खेळाडू व प्रशिक्षकांची काळजी घेण्यात येईल. विदेशी प्रशिक्षकांचा वेगळ्या पद्धतीने वापर करण्यात येईल. त्यांना वेतन देण्यात येत आहे. या अडचणीच्या समयी कुणाचेही वेतन थांबविण्यात येणार नाही.उदयोन्मुख खेळाडू स्वगृही परतले आहेत. त्यांना परत बोलविण्यात येईल. सरकार राष्ट्रीय क्रीडा महासंघाचीही मदत घेईल. केवळ खेळच नाही तर सामन्या जीवनही बदलले आहे. खेळही नव्या पद्धतीने पुढे वाटचाल करतील. आम्हाला प्रेक्षकांविना खेळ रंगतदार बनविण्याची योजना आखावी लागेल. भविष्यात स्टेडियम प्रेक्षकांविना असतील. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये अमाप पैसा आहे. त्यांना प्रसारण अधिकार करारातून पैसा मिळतो, पण अन्य खेळांना मदतीची गरज आहे. आम्ही त्या खेळांना व महासंघांना मदत करू.’ (वृत्तसंस्था)प्रशिक्षण सुरू करण्याासाठी साईतर्फे समितीचे गठनभारतीय क्रीडा प्राधिकरणने कोरोना व्हायरसमुळे देशभरात असलेले लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व केंद्रांवर खेळासोबत जुळलेले प्रशिक्षण सुरू करण्यासाठी एक योग्य संचालन प्रक्रिया (एसओपी) तयार करण्यासाठी सहा सदस्यांच्या समितीचे गठन केले आहे. या सहा सदस्यांच्या समितीची अध्यक्षता साईचे सचिव रोहित भारद्वाज करतील तर टार्गेट आॅलिम्पिक पोडियम स्किमचे (टॉप्स) मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राजगोपालन, कार्यकारी संचालक (परिचालन) एस.एस. रॉय, एस.एस. सरला, कर्नल बी.के. नायक आणि टॉप्सचे सहायक संचालक सचिन के. समितीचे अन्य सदस्य आहेत.कोविड-१९ महामारीमुळे साईच्या सर्व केंद्रात सराव व प्रशिक्षण ठप्प आहे. समिती एसओपीचा मसुदा तयार करेल. त्यात प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर या महामारीपासून बचावाचे उपाय असतील. प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक, तांत्रिक व बिगर तांत्रिक सहायता कर्मचारी, एनएसएफ (राष्ट्रीय क्रीडा महासंघ), प्रशासकांव्यतिरिक्त भोजनालय व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना या मसुद्यानुसार कार्य करावे लागेल. परिसरात प्रवेश करणारे चाहते व खेळासोबत जुळलेल्या भागधारकांनाही या मसुद्याचे पालन करावे लागेल. समितीच्या शिफारशी संबंधित एनएफएस व अन्य भागधारकांसोबत चर्चा केल्यानंतर तयार करण्यात येईल. अंतिम मंजुरीसाठी हा मसुदा क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल. सर्व एनएसएफला महामारीपासून बचावांच्या उपयांसाठी आपल्या शिफारशी शेअर करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. त्यात जलतरण क्रीडा प्रकारासाठी वेगळी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत