न्यूयॉर्क : खेळांचे साहित्य बनवणारी नायके ही जगप्रसिद्ध कंपनी आहे. पण या कंपनीला अमेरिकमध्ये टीका सहन करावी लागत आहे. राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी आता अमेरिकेमध्ये नायकेचे शूज जाळायला सुरुवात केली आहे.
प्रकरण नेमके कायनायके कंपनीने कॉलिन केपरनिक या अमेरिकेतील सॉकर खेळाडूला आपला ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे. या कॉलिनने अमेरिकेचा अपमान केला होता. एका कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरु असताना कॉलिन हा गुडघ्यावर बसून राहिला होता. त्यामुळे अमेरिकेत नायके कंपनीचा विरोध केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
नायकेचे शूज जाळतानाचा हा व्हिडीओ
कॉलिनने असे का केले?अमेरिकेमध्ये वर्णद्वेष आणि वांशिक शेरेबाजी होते, असे कॉलिनचे म्हणणे आहे. त्यामुळेच याविरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी कॉलिन अमेरिकेच्या राष्ट्रगीताच्या वेळी गुडघ्यावर बसून राहिला होता. कॉलिनने ही गोष्ट 2016 साली एका स्पर्धेदरम्यान केली होती.