साओ पाउलो : करचोरीप्रकरणी ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू व बार्सिलोना संघाचा सदस्य असलेल्या नेमारची तब्बल पाच कोटी डॉलरची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. साओ पाउलो येथील न्यायालयाच्या आदेशावरून त्याच्या खासगी विमानासह, जहाजदेखील ताब्यात घेण्यात आले आहे. नेमार व त्याच्या परिवाराने १ कोटी ६० लाख डॉलरची करचोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. नेमार ब्राझीलच्या क्लब सांतोससाठी २०११ ते १३ या काळात खेळत असताना करचोरीची घटना घडली होती. मात्र नेमारने हे आरोप धुडकावून लावले आहेत. ब्राझील कर विभागाचा एक अधिकारी म्हणाला, नियमाप्रमाणे नेमारने कर भरल्यास त्याची जेलवारी टळू शकते. बार्सिलोना संघाचे अवैधरीत्या हस्तांतरण केल्याप्रकरणी नेमार व त्याच्या पित्याची स्पॅनिश विभागाकडूनही चौकशी झाली होती. माद्रीद येथील न्यायालयात या २३ वर्षीय खेळाडूची २ फेब्रुवारी रोजी न्यायालयात तब्बल ३ तास चौकशी करण्यात आली होती.
न्यायालयाची नेमारला किक, करचुकवेगिरी : ५ कोटी डॉलरची मालमत्ता जप्त
By admin | Published: February 17, 2016 2:40 AM