अभिनवमध्ये क्रीड स्पर्धा
By admin | Published: August 20, 2015 10:10 PM
अकोले: हार जीत हा गौण भाग माञ जिद्दीने खेळा, खेळातील नैपुण्य दाखवा,कबड्डी हा मराठमोळा खेळ असून सांघिक भावनेतून खेळा असे मत अभिनव शिक्षण संस्थेचे मधुकर नवले यांनी व्यक्त केले.
अकोले: हार जीत हा गौण भाग माञ जिद्दीने खेळा, खेळातील नैपुण्य दाखवा,कबड्डी हा मराठमोळा खेळ असून सांघिक भावनेतून खेळा असे मत अभिनव शिक्षण संस्थेचे मधुकर नवले यांनी व्यक्त केले. तालुका स्तरीय कबड्डी व बुध्दीबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.१४,१७ व १९ वर्षीय वयोगाटाच्या शालेय क्रिडी स्पर्धा सुरु झाल्या आहे. यावेळी सभापती अंजना बोंबले,जि.प.सदस्य कैलास वाकचौरे,अगस्तीचे प्राचार्य संपत नाईकवाडी,मंदाबाई नवले,भाऊसाहेब नाईकवाडी,ल.का. नवले आदि मान्यवर उपस्थित होते. क्रिडा शिक्षक शिवाजी चौधरी यांनी प्रस्ताविक केले. रवी काळाने यांनी आभार मानले.हेमंत आवारी(तालुका प्रतिनिधी)