हैदराबाद : नेतृत्वाच्या जबाबदारीमुळे मी विश्वविक्रमी कामगिरी करू शकलो. अतिरिक्त जबाबदारीमुळे मी स्वत:ला दिग्गज मानत नाही. पाय जमिनीवर असल्यामुळेच सलग चार कसोटींत चार द्विशतके झळकवू शकलो, असे मत कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले.बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काल २०४ धावांची खेळी केलेल्या कोहलीने नेतृत्वाच्या जबाबदारीने मला दीर्घ खेळी करण्याची प्रेरणा दिल्याचे सांगितले. मोठी खेळी करण्याची ‘भूक’ कशी निर्माण झाली, याबद्दल तो म्हणाला, ‘माझ्या मते, नेतृत्वामुळे सामान्य फलंदाजांच्या तुलनेत अधिक प्रयत्न करण्याची ओढ लागते. कर्णधारासाठी मंत्रमुग्ध राहून चालत नाही. मी नेहमी दीर्घ खेळी करण्याच्या प्रयत्नात असायचो. सुरुवातीची ७-८ शतके बघा. मी १२० पेक्षा अधिक धावा काढू शकलो नाही. त्यानंतर स्वत:च्या भावनांवर नियंत्रण मिळवून मंत्रमुग्धतेपासून दूर होत गेलो.’ (वृत्तसंस्था)
विक्रमी कामगिरीचे श्रेय नेतृत्व, फिटनेसला
By admin | Published: February 12, 2017 5:22 AM