मॅन्चेस्टर युनायडेटचा (Manchester United FC) आघाडीचा फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo Fitness Regime) वयाच्या ३६ व्या वर्षीही फिटनेसच्या बाबतीत भल्या भल्यांना मात देण्याती ताकद ठेवतो. खेळात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी रोनाल्डो नेहमीच त्याच्या फिटनेसला सर्वाधिक प्राधान्य देत आला आहे आणि यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्याची तयारी असते. याबाबतच एक माहिती आता समोर आली आहे. दुखापतीवर मात करण्यासाठी रोनाल्डोनं इटलीहून खास ५० हजार पाऊंड खर्च करुन खास आइस बाथ चेंबर मागवलं आहे. यात कायरोथेरेपीसाठी (Cryotherapy ice chamber) खास सुविधा आहे. या चेंबरमध्ये बसल्यावर मांसपेशींना झालेली दुखापत लवकर बरी होते.
कायरोथेरेपी म्हणजे 'कोल्ड थेरेपी'. यात शरीराचं तापमान काही मिनिटांसाठी एका विशिष्ट सेल्सिअसपर्यंत येऊ दिलं जातं. त्यादृष्टीनं आसपास त्यापद्धतीचं वातावरण तयार केलं जातं. ब्रिटीश वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, रोनाल्डोनं कायरोथेरेपी चेंबर खास इटलीहून मागवला आहे.रोनाल्डो सध्या मेन्चेस्टर युनायडेटसाठी प्रीमिअर लीगमध्ये खेळत आहे. कोट्यवधी खर्चून रोलान्डोसाठी आइस बाथ चेंबर मागविण्यात आलं आहे. जेणेकरुन प्रीमिअर लीगमध्ये रोनाल्डो दुखापतग्रस्त झाल्यास तो लवकरात लवकर बरा होईल यासाठीची पूर्वतयारी करण्यात आली आहे. या चेंबरचं वैशिष्ट्य म्हणजे याचं तापमान तब्बल ऋण २०० डीग्रीपर्यंत खाली नेता येतं.
चेंबरमध्ये जास्तीत जास्त फक्त ५ मिनिटं थांबता येतंआइस बाथ चेंबर म्हणजे एका कॅप्सूलच्या आकाराचं चेंबर असतं. यात जाण्याआधी रोनाल्डोला एखाद्या बेसबॉल खेळाडूच्या स्पोर्ट्स किटसारखे कपडे परिधान करावे लागतात. कॅप्सूलच्या आकाराच्या चेंबरमध्ये उभं राहिलं की त्यात लिक्विड नायट्रोजन सोडण्यात येतं. जेणेकरुन रोनाल्डोच्या शरीराचं तापमान एका विशिष्ट अंशापर्यंत थंड केलं जातं. या कॅप्सूलमध्ये कोणताही व्यक्ती जास्तीत जास्त ५ मिनिटं राहू शकतो. कारण ५ मिनिटांपेक्षा अधिक काळ यात राहिल्यास ते आरोग्यसाठी हानीकारक ठरू शकतं.
कायरोथेरेपीनं नक्की काय होतं?कायरोथेरेपीचं समर्थन करणाऱ्या तज्ज्ञांच्या दाव्यानुसार या थेरेपीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती पटकन वाढते. त्यामुळे थकवा पटकन दूर होतो आणि दुखापत देखील लवकर बरी होण्यास मदत होते. त्यामुळे व्यावसायिक खेळाडू याचा वापर करतात. रोनाल्डो २०१३ सालापासून या थेरेपीचा वापर करत आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदकडून खेळत असताना रोनाल्डोसह मार्कस रेशफोर्ड आणि गेरेथ बेल यांनीही या थेरेपीचा त्यांच्या दुखापतीच्या काळात वापर केला आहे.