Cristiano Ronaldo Lionel Messi, Most Valuable Footballers: जगभरातील फुटबॉलपटूंबाबत जेव्हा चर्चा होते, तेव्हा अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटूलिओनेल मेस्सी आणि पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे नाव कायम घेतले जाते. सध्याच्या घडीला रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांमध्ये सर्वोत्तम कोण, याची स्पर्धा लागली आहे. कोणत्याही लहान-मोठ्या स्पर्धा असोत, त्या स्पर्धांमध्ये या दोघांची कामगिरी कायमच थक्क करणारी असते. पण नुकत्याच जाहीर झालेल्या एका यादीनुसार, रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांनाही एकाच वेळी मोठा धक्का बसला आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यासोबतच इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन यालाही धक्का बसला आहे.
जगातील टॉप १०० मौल्यवान फुटबॉलपटूंची (Most Valuable Footballers) यादी जाहीर झाली. या १०० फुटबॉलपटूंच्या यादीत मेसी आणि रोनाल्डोचे नाव नसल्याने साऱ्यांनाच धक्का बसला. तसेच नेहमी टॉप-१० मध्ये असणाऱ्या हॅरी केनला देखील ३०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या यादीत फ्रान्सचा कायलिन एमबापे (Mbappe) याने अव्वल स्थान पटकावले आहे. एमबापेचे मूल्य सुमारे £175 दशलक्ष इतके दाखवण्यात आले आहे.
व्हिनिसियस ज्युनियर दुसऱ्या क्रमांकावर आहे
नुकतेच UEFA चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत रिअल माद्रिदवर विजय मिळवणारा व्हिनिसियस ज्युनियर मोस्ट व्हॅल्युएबल फुटबॉलपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २१ वर्षीय ब्राझीलच्या फुटबॉलपटूने फायनलमध्ये गोल केल्याने रियल माद्रिदने लिव्हरपूलला १-० ने पराभूत केले होते. त्यामुळे विनिसियसचे मूल्य £158 दशलक्ष इतके दाखवण्यात आले आहे.
अर्लिंग हॅलंडची मुसंडी
इंग्लिश क्लब मँचेस्टर सिटीचा अर्लिंग हॅलंड यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने जोरदार मुसंडी मारून दिग्गजांना थक्क केले आहे. त्याचे ट्रान्सफर मूल्य अंदाजे £130 दशलक्ष आहे. यानंतर बार्सिलोनाचा स्टारलेट पेड्री चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाचवा क्रमांक बोरुसिया डॉर्टमंड क्लबच्या बेलिंगहॅमने पटकावला आहे.