शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

ख्रिस्तियानो रोनाल्डो, रानियेरी मानकरी

By admin | Published: January 11, 2017 1:29 AM

रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला

झ्युरिच : रियल माद्रिद व पोर्तुगालचा स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने देशातर्फे आणि क्लबतर्फे खेळताना २०१६ मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत फिफाचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. लिसेस्टर सिटीच्या क्लाडियो रानियेरीची वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. प्रीमियर लीगमध्ये त्यांच्या संघाने चमकदार कामगिरी करीत जेतेपदाला गवसणी घातली. ३१ वर्षीय रोनाल्डोने परंपरागत प्रतिस्पर्धी लियोनल मेस्सी व युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये आघाडीचा खेळाडू ठरलेला फ्रान्सचा ग्रिजमॅन यांना पिछाडीवर सोडत वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोने कारकिर्दीत चॅम्पियन्स लीगचे तिसरे जेतेपद आणि पोर्तुगालसह युरो २०१६ मध्ये जेतेपद पटकावल्यानंतर ‘बेलोन डिओर’ पुरस्काराचा मान मिळवला. त्याने चॅम्पियन्स लीगमध्ये १२ सामन्यांत १६ गोल नोंदवले. फिफाचे अध्यक्ष जियानी इनफन्टिनो यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्यानंतर रोनाल्डो म्हणाला, ‘२०१६ हे माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष ठरले.’दुसऱ्या बाजूचा विचार करता ६५ वर्षीय रानियेरी यांनी रियोचे व्यवस्थापक जिनेदिन जिदान व पोर्तुगालचे व्यवस्थापक फर्नांडो सांतोस यांना पिछाडीवर सोडत सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार पटकावला  त्यांना अर्जेंटिनाचे महान खेळाडू डिएगो मॅराडोना यांनी ही ट्रॉफी प्रदान केली. गेल्या वर्षी रेलिगेशनची नामुष्की टाळण्यात यशस्वी ठरल्यानंतर यंदा सर्वांना चकित करीत त्यांनी हा पुरस्कार पटकावला. खेळाडूंची निवड राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक व कर्णधार यांच्या व्यतिरिक्त निवडक पत्रकारांचा गट व चाहत्यांच्या मतांच्या आधारावर करण्यात आली. रोनाल्डोला ३१.५ टक्के तर मेस्सीला २६.४ टक्के मते मिळाली. मेस्सी या पुरस्कार वितरण समारंभात सहभागी झाला नव्हता. कार्यक्रमाचे संचालन अमेरिकेची अभिनेत्री इवा लोंगोरियाने केले. अमेरिकेची मिडफिल्डर कार्ली लॉयडची २०१६ ची सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. वर्षातील सर्वश्रेष्ठ फिफप्रो संघातील ११ पैकी ९ खेळाडू स्पेनच्या ला लीग्मधील आहेत. त्यांचे नेतृत्व रोनाल्डो व मेस्सी यांनी केले. बायर्न मुनिचचा गोलकीपर मॅन्युअल न्यूर याने सलग चौथ्या वर्षी संघात स्थान पटकावले. फिफाने कोलंबियाचा संघ एटलेटिको नेसियोनलची ‘फेयर प्ले’ पुरस्कारासाठी निवड केली. या संघाने अमेरिकी फुटबॉलचे संचालन करणाऱ्या संस्थेला विभागीय क्लब स्पर्धेचे जेतेपद चॅपेकोएंस संघाला बहाल करण्याची विनंती केली होती. ब्राझीलच्या चॅपेकोएंस संघातील अनेक खेळाडूंचा फायनलच्या पहिल्या टप्प्यातील लढतीसाठी प्रवासादरम्यान विमान अपघातात मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)