Cristiano Ronaldo Rape Lawsuit: पोर्तुगालचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेडचा स्टार फुटबॉलर क्रिस्टीयानो रोनाल्डो याला न्यालायलाकडून १३ वर्ष जुन्या खटल्यात दिलासा मिळाला. रोनाल्डोने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करत त्याच्यावर अमेरिकन कोर्टात खटला दाखल केला होता. या खटल्याची कारवाई थांबवत कोर्टाने रोनाल्डोची निर्दोष मुक्तता केली.
नेवादाच्या कॅथरीन मायोग्रा या महिलेने २००९ साली रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप करत खटला दाखल केला होता. लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये रोनाल्डोने तिच्यावर हल्ला केला आणि मग तिच्यावर अतिप्रसंग केला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याचीच नुकसान भरपाई म्हणून त्या महिलेने रोनाल्डोकडून ३.७५ लाख अमेरिकन डॉलर्सची मागणी केली होती. शनिवारी या संदर्भात कोर्टात सुनावणी झाली. ४२ पानी निकालपत्रात न्यालायलाने रोनाल्डोची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. निकालपत्रात रोनाल्डोवर गंभीर आरोप करणाऱ्या नेवादाच्या वकिलांना समज देण्यात आली. खटल्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेचे योग्यपद्धतीने पालन न केल्याचा ठपकाही महिलेच्या वकिलावर ठेवण्यात आला. तसेच, प्रक्रियेचा दुरूपयोद केला गेला असून हा खटला पुढे सुनावणीसाठी चालवला जाणार नाही, असं निरिक्षण न्यायालयाने नोंदवले.
रोनाल्डो सध्या गर्लफ्रेंड जॉर्जिना आणि पाच मुलांसमवेत पोर्तुगालमध्ये वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण दुर्दैवाने त्यातील मुलाचा मृत्यू झाला. रोनाल्डोने सोशल मीडियावरून याबद्दलची माहिती दिली होती. दरम्यान रोनाल्डोने पाच वेळा फुटबॉल जगतातील मानाचा बॅलन डी ओर किताब जिंकला आहे. तसेच चार वेळा युरोपिय गोल्डन शूज पुरस्कारही पटकावला आहे. आंतरराष्ट्राय स्तरावर सर्वाधिक गोल मारण्याचा विक्रम क्रिस्टीयानो रोनाल्डोच्या नावावर आहे.