माद्रिद : चॅम्पियन्स लीगमधील आपले अभियान धडाक्यात सुरवात करताना रियाल माद्रीद संघाने शाक्तर डोनेस्कवर ४-0 अशी जबरदस्त मात केली. संघाचा पोर्तुगाली स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोने हॅटट्रीक नोंदवून विजयात सिंहाचा वाटा उचलला शिवाय त्याच्या आजच्या करामतीमुळे तो गोलशर्यतीत त्याचा प्रतिस्पर्धी लियोनाल मेस्सीच्या पुढे गेला आहे. रोनाल्डोने ५५ आणि ६३ व्या मिनिटाला पहिले दोन गोल पेनाल्टीवर नोंदविले, तर तिसरा ८१ व्या मिनिटाला तिसरा गोल नोंदवून हॅट्रीक केली. या हॅटट्रीकमुळे चॅम्पियन्स लीगमध्ये त्याचे ८0 गोल झाले असून आता तो लियोनाल मेस्सीच्या पुढे टॉप स्कोअरर म्हणून गेला आहे. शाक्तरचा गोलकिपर आंद्रे पेटोव्हच्या चुकीचा फायदा घेत करिम बेंझेमाने पहिला गोल नोंदवून ३0 व्या मिनिटाला रियाल माद्रीदचे खाते उघडले. यानंतर रोनाल्डोने ५५, ६३ आणि ८१ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामन्यात हॅटट्रीक केली. गेल्या चार दिवसातील दोन सामन्यात त्याने ८ गोल नोंदविले आहेत. या कामगिरीमुळे त्याचे आता चॅम्पियन्स लीगमध्ये ८0 गोल झाले आहेत. आजच्या सामन्यापूर्वी दोघेही ७७ च्या गोलसंख्येवर बरोबरीत होते. आजच्या हॅटट्रीकमुळे रोनाल्डो ३ गोलनी पुढे गेला आहे. आजच्या सामन्यात रियाल माद्रीदने पूर्णवेळ वर्चस्व गाजविले. शाक्तरच्या खेळाडूंनी निराशाजनक खेळ केलाच शिवाय त्यांच्या खेळाडूंना पाच यलो कार्डस मिळाली. मी खूप आनंदित आहे, माझ्या सहकाऱ्यांनी मला आत्मविश्वास मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे आभार. आम्ही ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगमध्ये परफेक्ट स्टार्ट करण्याचे ठरविले होते. पण ला लीगामध्ये पहिल्या सामन्यात बरोबरी झाल्यामुळे थोडी निराशा आली होती. पण चॅम्पियन्स लीगमध्ये आम्ही सगळी कसर भरुन काढली. त्यासाठी सामन्यापूर्वीचे सराव सत्र महत्वाचे ठरले. आम्ही आता योग्य ट्रॅक पकडला आहे. -ख्रिस्टियानो रोनाल्डो, स्ट्रायकर, रियाल माद्रीदसध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी टॉप फाईव्हअ. क्र.खेळाडूदेशगोलक्लब१ख्रिस्टीयानो रोनाल्डो पोर्तुगाल८0रिआल माद्रीद२लिओनाल मेस्सीअर्जेंटिना७७बार्सिलोना३करिम बेन्झेमाफ्रान्स४३रिआल माद्रीद४झेड इब्राहिमोव्हिकस्वीडन४३सेंट जर्मन५थॉमस म्युलरजर्मनी३0बायर्न म्युनिच
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या हॅट्ट्रिकने मेस्सीला टाकले मागे
By admin | Published: September 18, 2015 12:00 AM