- रवी शास्त्री लिहितात... स नरायजर्स हैदराबादच्या जमेची बाब अशी की संघाच्या चार गोलंदाजांच्या नावे किमान दहा बळींची नोंद आहे. संघाचे आघाडीचे फलंदाजही मोलाचे योगदान देत आहेत. संघातील प्रत्येकजण सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी सज्ज असतो. या सर्व बाबी हैदराबादच्या ड्रेसिंगरुममध्ये उत्साहाचा संचार करणाऱ्या ठराव्या.संघाच्या यशात व्यवस्थापनाची पडद्यामागील मेहनत मोलाची ठरते. प्रत्येक गोष्टींवर फार संशोधन केले जात आहे. संघात सहा बदल करूनही मुंबई इंडियन्स विजयी ठरू शकतो किंवा विलियम्सन, युवी यांच्या अनुपस्थितीतही हैदराबाद बाजी मारणार असेल तर संघ व्यवस्थापन मेहनत घेत असावे असे समजा. सर्वसामान्यांना हे दिसत नाही.केकेआर देखील सर्व कसोट्यांवर यशस्वी ठरत नाही, असेही नाही. केकेआर सर्वदृष्टीने संतुलित संघ आहे. यानंतरही आघाडीच्या दोन स्थानांवर नाव कोरता न आल्याबद्दल संघात निराशा असेल. हा संघ सहजपणे पहिल्या दोन संघात येऊ शकला असता. तथापि नंतरच्या काही सामन्यात केकेआरची फलंदाजी ढेपाळली. तरीही त्यांच्या फलंदाजांच्या क्षमतेवर आक्षेप नोंदविता येणार नाही. मागच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर याने रिव्हर्स स्वीप आणि स्विच हिटचे फटके मारून फिरकीपटूंना अक्षरश: धुतले. पण गंभीरला मी ओळखतो. तो आपल्या फिरकीपटूंबद्दल विश्वास बाळगेल आणि आक्रमक क्षेत्ररक्षणाच्या बळावर हैदराबादची कोंडी करण्याचा प्रयत्न करेल. अव्वल संघ साधारणत: प्रतिस्पर्धी संघांना मार्ग काढण्यासाठी कुठलीही संधी देत नाहीत.बेंगळुरुत बऱ्यापैकी धावा निघतात. येथे संघांना १६० किंवा त्याच्या जवळपास धावांचे लक्ष्य गाठणे कठीण जाते. येथे मधल्या टप्प्यातील गोलंदाजीची भूमिका निर्णायक ठरते. या टप्प्यात अनेक संघांना धावा घेण्यात अडचण जाणवत असल्याने सुरुवातीला फलंदाजीचा पर्याय वाईट नाही. या दोनपैकी एका संघाची आयपीएल-१० मधील वाटचाल आज संपुष्टात येणार आहे. येथे कुठलीही दुसरी संधी नाही. पण कुणीही जिंको, सामन्यांदरम्यान प्रत्येकवेळी केलेल्या संघर्षांवर दोन्ही संघांना गर्व वाटेल. करायचे होते ते सर्वकाही केले याचेही दोन्ही संघांना समाधान असेल. (टीसीएम)
गंभीरची भिस्त फिरकीवर
By admin | Published: May 17, 2017 4:09 AM