शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

CWG 2022:ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, भारतीय महिला सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 12:50 PM

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला.

बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मुळे खेळमय वातावरण झाले आहे. इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा (Indian Hockey Team) उपांत्यफेरीत (Semi Final) पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने शूट आऊटमध्ये भारतीय संघाचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ सलग पाचव्यांदा फायनलमध्ये पोहचला आहे. भारतीय संघ सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर झाला असला तरी संघाला कांस्य पदक पटकावण्याची संधी असणार आहे.

शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवला विजय खरं तर हा सामना सर्वप्रथम १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी शूट आऊट सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३-० ने मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या पराभवामध्ये पंचाचा देखील मोठा वाटा राहिला. शूट-आऊटमध्ये भारताने पहिला गोल वाचवला होता, पण नंतर वेळ सुरूच झाली नसल्याचे सांगण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी देण्यात आली. यानंतर भारतीय संघ पिछाडीवर गेला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या हाफपर्यंत भारतावर १-० अशी आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियाकडून हा एकमेव गोल रेबेका ग्रेनर हिने १० व्या मिनिटाच केला. मात्र यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने पहिला गोल केला. भारताच्या वंदना कटारियाने गोल करून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती मात्र शूट-आऊटमध्ये भारताचा पराभव झाला. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत वंदनाने हा चौथा गोल केला आहे. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाHockeyहॉकीIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलिया