शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

द.आफ्रिकेला पहिल्या विजयाची संधी

By admin | Published: March 20, 2016 4:12 AM

शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुध्द २२९ धावा उभारल्यानंतरही पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा याच स्टेडियमवर

मुंबई : शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुध्द २२९ धावा उभारल्यानंतरही पराभवास सामोरे जावे लागल्यानंतर दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा याच स्टेडियमवर रविवारी विजयी मार्गावर येण्यास उतरेल. यावेळी आव्हान असेल ते दुबळ्या अफगाणिस्तानचे. त्यामुळे ही लढत मोठ्या फरकाने जिंकून टी२० विश्वचषकमधील पहिला विजय मिळवताना धावगती सुधारण्याच्या प्रयत्नात आफ्रिकन्स असतील.मजबूत फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडपुढे भलेमोठे आव्हान ठेवल्यानंतरही पराभूत झाल्याने आफ्रिकेसमोर गोलंदाजांची कामगिरी चिंतेचा विषय बनला आहे. त्याचवेळी क्षेत्ररक्षकांकडूनही चुका झाल्याचा फटका बसल्याने क्षेत्ररक्षणातही सुधारणा करण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे आहे. अनुभवी इम्रान ताहीरचा अपवाद वगळता आफ्रिकेचे सर्व गोलंदाज चांगलेच महाग ठरले. इंग्लंडविरुध्द ३ बळी घेत काएल एबॉट जरी यशस्वी ठरला असला, तरी त्याने ११.१८ च्या धावगतीने धावा दिल्या होत्या. त्यामुळेच अफगाणिस्तानविरुद्ध एबॉटसह, कागिसो रबाडा, डेल स्टेन, ख्रिस मॉरीस आणि जेपी ड्युमिनी यांना या सामन्यातून आपली लय मिळवण्याची चांगली संधी असेल. त्याचवेळी फलंदाजी मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. हाशिम आमला, क्विंटन डीकॉक, जेपी ड्युमिनी यांनी तडाखेबंद अर्धशतक झळकावत आफ्रिकेला मजबूत धावसंख्या उभारुन दिली होती. तर धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स, फाफ डू प्लेसिस आणि डेव्हीड मिल्लर आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले होते. मात्र अफगाणिस्तानविरुध्द हे तिघेही चांगला सराव करून घेतील. दुसरीकडे वेगवान गोलंदाज असगर स्टेनिकजईच्या नेतृत्वाखाली नवखे अफगाणिस्तान स्वत:ला पारखण्यासाठी खेळतील. गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीचा खेळ सुधारताना अफगाणिस्तानने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. मात्र तरीही दक्षिण आफ्रिकासारख्या तगड्या संघाला नमवण्यासाठी त्यांना एका चमत्काराचीच आवश्यकता असेल.मोहम्मद नाबी आणि राशिद खान या फिरकी जोडीने प्रत्येकी ७ बळी घेत स्पर्धेत अग्रस्थान पटकावले आहे. मात्र आफ्रिकेच्या मजबूत फलंदाजीविरुध्द त्यांच खरी कसोटी लागेल. अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका या संघामध्ये आतापर्यंत केवळ एक सामना झाला असून यामध्ये आफ्रिकाने ५९ धावांनी बाजी मारली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)संघ यातून निवडणार दक्षिण आफ्रिका : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), काएल एबॉट, हाशिम आमला, फरहान बेहरदीन, क्विंटन डीकॉक, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहीर, डेव्हीड मिल्लर, ख्रिस मॉरीस, अ‍ॅरॉन फागिसो, कागिसो रबाडा, रिली रोसेयू, डेल स्टेन आणि डेव्हीड वीसे.अफगाणिस्तान : असगर स्टेनिकजई (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूर अली जादरान, उस्मान घनी, मोहम्मद नाबी, करीम सादिक, शफीकुल्लाह शाफिक, रशिद खान, अमीर हमला, दवलत जादरान, शापूर जादरान, गुलबेदीन नैब, समीउल्लाह शेनवारी, नजीबुल्लाह जादरान आणि हामिद हसन.सामन्याची वेळ दुपारी ३.००. स्थळ : वानखेडे स्टेडियम, मुंबई