शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

डेल पेट्रोने केले वावरिंकाला ‘आऊट’

By admin | Published: July 02, 2016 5:55 AM

स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलॉस वावरिंका याला ३-६, ६-३, ७-६, ६-३ असे पराभूत करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून ‘आऊट’ केले

लंडन : अमानांकित अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पेट्रो याने पुरुषांच्या गटात सर्वात खळबळजनक निकालाची नोंद करताना चौथ्या मानांकित स्वीत्झर्लंडच्या स्टेनिसलॉस वावरिंका याला ३-६, ६-३, ७-६, ६-३ असे पराभूत करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून ‘आऊट’ केले आहे.२७ वर्षीय डेल पेट्रो याने दुसऱ्या फेरीतील ही लढत २ तास ४३ मिनिटांत जिंकली. डेल पेट्रोने पहिला सेट गमाविल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारताना मोठा विजय मिळविला. वावरिंकाने बॅकहँडवर निरर्थक चुका केल्या आणि सामना गमाविला. डेल पेट्रोने तिसरा सेट टायब्रेकमध्ये ७-२ ने जिंकला. त्यानंतर चौथ्या सेटमध्ये वावरिंकाला डोके वर काढण्याची उसंतच मिळू दिली नाही.अर्जेंटिनाच्या खेळाडूने १0 पैकी ४ ब्रेक गुण, तर वावरिंकाने ५ पैकी तीन ब्रेक गुण जिंकले. डेल पेट्रोने सामन्यात ९ बिनतोड सर्व्हिस केली आणि पहिल्या सर्व्हिसवर त्याचे गुण जिंकण्याची टक्केवारी वावरिंकाच्या तुलनेत जास्त होती. स्पर्धेचा पाचव्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला; परंतु याच दिवशी सेंटर कोर्टवर छताखालील झालेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत सनसनाटी निकाल नोंदवला गेला. त्याआधी काल महिला एकेरीत द्वितीय मानांकित स्पेनची गर्बाइन मुगुरुजाला स्लोव्हाकियाच्या याना सेपेलोव्हाने ६-३, ६-२ असे सलग सेटमध्ये पराभूत केले. (वृत्तसंस्था)>ट्रायकीने पंचांना म्हटले ‘मूर्ख’, जगातील सर्वांत वाईट’ सर्बियाचा व्हिक्टर ट्रायकी याने गुरुवारी विम्बल्डनच्या जुन्या टोमणेबाजीची आठवण ताजी करताना पंचांना ‘मूर्ख’ आणि ‘जगातील सर्वांत’ वाईट असे म्हटले.सर्बियाच्या २५ व्या मानांकित ट्रायकीला स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलास याच्याविरुद्ध ३-६, ६-३, २-६, ६-३ असा पराभव पत्करावा लागला आणि यादरम्यान पंच डेमियानो टोरेला याला एक गुण देण्याच्या निर्णयामुळे त्याला मॅच पॉइंटचा सामना करावा लागला. स्पेनच्या रामोसची एक सर्व्हिस पंचांनी ‘आऊट’ ठरवली; परंतु त्यानंतर निर्णय बदलताना त्याला बिनतोड सर्व्हिस ठरवली. त्यामुळे कोर्ट १७ वर ट्रायकी नाराज झाला व तो पुढच्याच पॉइंटवर पराभूत झाला.ट्रायकीने निर्णय बदलल्यानंतर म्हटले, ‘‘पाहा, पांढऱ्या ठिकाणी काहीही लागलेले नाही पाहा. कृपा करून एकदा तरी पाहा. तुम्ही जगातील सर्वांत वाईट पंच आहात.’’ त्यानंतर त्याने चेंडू कोर्टच्या बाहेर फेकून दिला. त्याच्या वर्तनामुळे त्याला आचारसंहितेच्या उल्लंघनाचा सामना करावा लागला.