विंडीज १५० धावांनी विजयी : रामदीन, सिमन्स यांची अर्धशतकेख्राईस्टचर्च : मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांनी दिलेले योगदान तसेच आंद्रे रसेल (नाबाद ४२) याच्या अष्टपैलू कामगिरी, आणि नंतर जेरॉम टेलर (३/१५) यांच्या खेळाने वेस्ट इंडिजने शनिवारी पाकिस्तानला तब्बल १५० धावांनी धूळ चारून विश्वचषकात विजयी लय गाठली. सलग दुसऱ्या पराभवानंतर पाकच्या अडचणी वाढल्या आहेत.पहिल्या सामन्यात आयर्लंडकडून पराभूत झालेल्या विंडीजने फलंदाजीचे आमंत्रण मिळताच ६ बाद ३१० धावा उभारल्या. मधल्या फळीत दिनेश रामदीन ५१ आणि लेंडल सिमन्सने ५०; तसेच डॅरेन ब्राव्हो ४९, मर्लोन सॅम्युअल्स ३८, डॅरेन सॅमी २८ चेंडूंत ३०, रसेलने १३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकाराच्या साहाय्याने नाबाद ४२ धावांचे योगदान दिले. विंडीजने अखेरच्या १० षटकांत ११५ धावा खेचल्या. पाकच्या फलंदाजांनी आजही गुडघे टेकले. ३९ षटकांत १६० धावांत त्यांचा डाव संपुष्टात आला. पाक संघाची सुरुवातीला घसरगुंडी झाली. एका धावेवर त्यांचे चार गडी बाद झाले. वन डे क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाची ही सर्वांत खराब सुरुवात ठरली. रसेल आणि सुलेमान बेन यांनी पाकची तळाची फळी गुंडाळली. पाकचा अर्धा संघ २५ धावांत तंबूत परतला होता. शोएब मकसूद ५० आणि उमर अकमल ५९ यांनी सहाव्या गड्यासाठी ८० धावांची भर घातली. शाहिद आफ्रिदी २८ हा दुहेरी आकडा गाठणारा तिसरा आणि शेवटचा फलंदाज ठरला.१९ चेंडूंत ४ बाद १ अशी पाकची स्थिती होताच लक्ष्य गाठण्याची शक्यता मावळली होती. नासीर जमशेद, युनिस खान, हॅरिस सोहेल आणि अहमद शहजाद हे तंबूत परतले. टेलरने पाकच्या तीन फलंदाजांना भोपळादेखील फोडू दिला नाही. कर्णधार मिस्बाहदेखील सात धावा काढून परतला. मकसूद-अकमल यांनी पडझड थांबवली खरी; पण मोठी धावसंख्या गाठण्याचा दबाव त्यांच्यावर दिसत होता. सॅमीने मकसूदचा झेल घेत ही जोडी फोडली. विंडीजची सुरुवातदेखील अडखळत झाली. आठव्या षटकात २ बाद २८ धावा होत्या. विंडीजच्या फलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये विकेट वाचविल्याशिवाय मनसोक्त धावा कुटल्या. सॅमी-रसेल यांनी तर पाकचा मारा अक्षरश: फोडून काढला. ख्रिस गेल याचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी विंडीजच्या विजयात मोलाचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)वेस्ट इंडिज : ड्वेन स्मिथ झे. हॅरिस सोहेल गो. सोहेल खान २३, ख्रिस गेल झे. वहाब रियाझ गो. इरफान ४, डॅरेन ब्राव्हो निवृत्त ४९, मर्लोन सॅम्युअल्स झे. बदली खेळाडू गो. हॅरिस सोहेल ३८, दिनेश रामदीन झे. बदली खेळाडू गो. हॅरिस सोहेल ५१, लेंडल सिमन्स धावबाद ५०, डॅरेन सॅमी झे. आफ्रिदी गो. वहाब रियाझ ३०, आंद्रे रसेल नाबाद ४२, अवांतर : २३, एकूण : ५० षटकांत ६ बाद ३१० धावा. गोलंदाजी : मोहम्मद इरफान १०-०-४४-१, सोहेल खान १०-१-७३-१, हॅरिस सोहेल ९-०-६२-२, वहाब रियाझ १०-०-६७-१, शोएब मकसूद १-०-८-०. पाकिस्तान : नासिर जमशेद झे. रसेल गो. टेलर ००, अहमद शहजाद झे. सिमन्स गो. होल्डर १, युनिस खान झे. रामदीन गो. टेलर ००, हॅरिस सोहेल झे. बदली खेळाडू गो. टेलर ००, मिस्बाह-उल-हक झे. गेल गो. रसेल ७, शोएब मकसूद झे. बेन गो. सॅमी ५०, उमर अकमल झे. स्मिथ गो. रसेल ५९, शाहिद आफ्रिदी झे. होल्डर गो. बेन २८, वहाब रियाझ झे. रामदीन गो. रसेल ३, सोहेल खान झे. रामदीन गो. बेन १, मोहम्मद इरफान नाबाद २, अवांतर : ९, एकूण : ३९ षटकांत सर्व बाद १६० धावा. गोलंदाजी : टेलर ७-१-१५-३, होल्डर ७-२-२३-१, रसेल ८-२-३३-३, सॅमी ८-०-४७-१, बेन ९-०-३९-२.नंबर गेम...१५० एकदिवसीय क्रिकेटमधील वेस्ट इंडिज संघाचा पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावांचा विजय. यापूर्वी विंडीजने पाकला १९९२ मध्ये सिडनी येथे १३३ धावांनी पराभूत केले होते. ०१ पाकिस्तान संघाची एक धाव झाली होती तेव्हा त्यांचे चार फलंदाज तंबूत परतले होते. यापूर्वीचा विक्रम कॅनडाच्या नावावर आहे. २००६ मध्ये पोर्ट आॅफ स्पेन येथे झिम्बाब्वे संघाने त्यांची अशी स्थिती केली होती. ५१ वेस्ट इंडिजच्या ३१० धावांमध्ये ५१ ही सर्वोच्च धावसंख्या होती. ३०० अधिक धावांमध्ये ५१ ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी ३०१ धावसंख्या असताना ५६ ही कमी संख्या होती, जेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने २००५ मध्ये जोहान्सबर्ग येथे झिम्बाब्वेविरुद्ध केली होती. २०१.३ आंद्रे रसेलचा मागील चार एकदिवसीय लढतींमध्ये २०१.३ स्ट्राईक रेट होता. त्याने ११ षटकांत ७८ चेंडूंत १५७ धावा केल्या आहेत आणि तो फक्त एकदाच बाद झाला आहे. ७०१ दिनेश रामदीनने २०१४ च्या सुरुवातीपासून १८ एकदिवसीय डावांमध्ये ७०१ धावा केल्या आहेत.
पाकिस्तानची दुसऱ्या लढतीतही नाचक्की
By admin | Published: February 21, 2015 11:48 PM