शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

डेअरडेव्हिल्स पुण्याचे समीकरण बिघडविणार?

By admin | Published: May 12, 2017 1:02 AM

आयपीएल प्ले-आॅफच्या शर्यतीबाहेर पडलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आज शुक्रवारी घरच्या मैदानावर विजय नोंदवित रायजिंग पुणे

नवी दिल्ली : आयपीएल प्ले-आॅफच्या शर्यतीबाहेर पडलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आज शुक्रवारी घरच्या मैदानावर विजय नोंदवित रायजिंग पुणे सुपरजायंटचे समीकरण बिघडविण्याची संधी आहे.डेअरडेव्हिल्सला अखेरचे दोन्ही सामने कोटलावर खेळायचे आहेत. दोन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा कायम राखण्याचा दिल्लीचा निर्धार आहे. ग्रीनपार्कवर काल गुजरातवर दोन गड्यांनी विजय मिळविल्याने दिल्लीचा आत्मविश्वासही उंचावला. कालच्या विजयासह १२ सामन्यांत १० गुणांसह हा संघ सहाव्या स्थानावर आला. झहीरच्या नेतृत्वाखालील हा संघ आता पुढील दोन्ही सामन्यांत कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे.दुसरीकडे पुणे संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा राहील. पुण्याचे १२ सामन्यांत १६ गुण असल्याने केवळ प्ले आॅफमध्ये स्थान पटकविण्याचेच नव्हे तर अव्वल दोन संघात स्थान मिळविण्याचेहीस्वप्न बाळगले आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील पुण्याने मागच्या आठपैकी सात सामन्यांत विजय नोंदविला असल्याने कोटलावर दिल्लीच्या उणिवांचा लाभ घेत चित्र स्पष्ट करण्याच्या निर्धाराने हा संघ खेळेल. दिल्लीचे फलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरले. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन गुजरात लायन्सविरुद्ध दमदार खेळले पण नंतर दोन्ही सामन्यात अपयशी ठरले होते. कोरी अँडरसन आणि करुन नायरदेखील कामगिरीत सातत्य राखू शकले नाहीत. श्रेयस अय्यरने मात्र ग्रीनपार्कवर धडाकेबाज खेळी केली. गोलंदाजीत झहीर, शमी, पॅट कमिन्स आणि अमित मिश्रासारखे सरस गोलंदाज असले तरी दिल्लीचा मारा कमकुवत वाटतो. पुणे संघाकडून युवा राहुल त्रिपाठी आणि कर्णधार स्मिथ याने संघासाठी नियमित योगदान दिले तर बेन स्टोक्स हा गेल्या काही सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकला. महेंद्रसिंग धोनी हा देखील सुरुवातीच्या अपयशानंतर फॉर्ममध्ये आला आहे. गोलंदाजीत या संघाकडे जयदेव उनाडकट, द. आफ्रिकेचा इम्रान ताहिर आणि स्टोक्स हे प्रभावी मारा करणारे खेळाडू आहेत. ताहिरच्या अनुपस्थितीतफिरकी विभागाची जबाबदारी अ‍ॅडम झम्पा तसेच वॉशिंग्टन सुंदर हे सांभाळू शकतात. उनाडकटने हैदराबादविरुद्ध पाच गडी बाद केले होते. या कामगिरीची दिल्लीविरुद्ध पुनरावृत्ती व्हावी, असे कर्णधार स्मिथला वाटत असावे. (वृत्तसंस्था)