शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

डेअरडेव्हिल्स विजयी

By admin | Published: April 24, 2016 3:58 AM

संजू सॅमसनच्या (६०) अर्धशतकी खेळीनंतर लेग स्पिनर अमित मिश्राच्या (२४ धावांत २ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने गृहमैदान फिरोजशाह कोटलावर खेळताना

नवी दिल्ली : संजू सॅमसनच्या (६०) अर्धशतकी खेळीनंतर लेग स्पिनर अमित मिश्राच्या (२४ धावांत २ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने गृहमैदान फिरोजशाह कोटलावर खेळताना शनिवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात आपल्या तिसऱ्या विजयाची नोंद केली. दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४ बाद १६४ धावांची आव्हानात्मक मजल मारली आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सचा डाव ७ बाद १५४ धावांत रोखला. दिल्ली संघाचा चार सामन्यांतील हा तिसरा विजय ठरला, तर मुंबई संघाचा सहा सामन्यातील हा चौथा पराभव ठरला. मुंबई संघाची भिस्त कर्णधार रोहित शर्मावर होती. आतापर्यंत मुंबई संघाने मिळवलेल्या दोन्ही विजयांमध्ये रोहितने अर्धशतकी खेळी केली आहे. रोहितने ४८ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने शानदार ६५ धावा फटकावल्या. मुंबई संघाला अखेर १० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई संघासाठी कर्णधार रोहितचे अखेरच्या षटकात धावबाद होणे दुर्दैवी ठरले. मुंबईला अखेरच्या षटकात विजयासाठी २१ धावांची गरज होती. रोहितने ख्रिस मॉरिसच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला, पण तिसऱ्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याची सहकारी हार्दिक पंड्यासोबत टक्कर झाली आणि पवन नेगीच्या थेट थ्रोवर तो धावबाद झाला. लेग स्पिनर अमित मिश्राने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मिश्राने सुरुवातीला अंबाती रायुडूला (२५) क्लिन बोल्ड केले तर जोस बटलरला (२) पायचित केले. दिल्लीचा कर्णधार झहीर खानने आपल्याच षटकात कृणाल पंड्याला (३६) धावबाद केले. किरॉन पोलार्डला (१९) झहीरने तंबूचा मार्ग दाखवला. मिश्राने दोन, तर मॉरिस व झहीर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. त्याआधी, संजू सॅमसन (६०) व जेपी ड्युमिनी (नाबाद ४९) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ४ बाद १६४ धावांची मजल मारली. सॅम्सनने ४८ चेंडूंना सामोरे जाताना ६० धावा फटकावल्या. त्यात चार चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. सॅमसनने ड्युमिनीसोबत चौथ्या विकेटसाठी ८.३ षटकांत ७१ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था) संक्षिप्त धावफलकदिल्ली डेअरडेव्हिल्स : क्विंटन डिकाक झे. पंड्या गो. मॅक्लेनघन ०९, श्रेयस अय्यर झे. रायुडू गो. पंड्या १९, संजू सॅमसन झे. साऊदी गो. मॅक्लेनघन ६०,जे.पी. ड्युमिनी नाबाद ४९, पवन नेगी नाबाद १०. अवांतर (१२). एकूण २० षटकांत ४ बाद १६४. गोलंदाजी : मॅक्लेनघन २/३१, हार्दिक पंड्या १/७, हरभजन १/२४, मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा धावबाद ६५, अंबाती रायुडू त्रि. गो. मिश्रा २५, कृणाल पंड्या धावबाद ३६, पोलार्ड झे. मॉरिस गो. झहीर १९; अवांतर (३). एकूण २० षटकांत ७ बाद १५४. गोलंदाजी : झहीर १/३०, मॉरिस १/२७, मिश्रा २/२४.