सेंट जोन्स : कराराविषयी वादानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळातील पदाधिकाऱ्यांचे वर्णन महामूर्ख करणाऱ्या डॅरेन ब्राव्हो याला संघातून ‘आउट’ करण्यात आले आहे.ब्राव्होला झिम्बाब्वेत होणाऱ्या आगामी तिरंगी एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडीज संघातून काढून टाकण्यात आले. ब्राव्होने त्याचा करारात ‘क’ श्रेणीत समावेश केल्यानंतर बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना महामूर्ख असे म्हटले होते.ब्राव्होने आघाडीच्या खेळाडूंशी नवीन कराराच्या प्रस्तावाविषयी ट्विटरवर डब्ल्यूआयसीबीचे अध्यक्ष डेव्ह कॅमरन यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले आहे. ब्राव्होने ‘ट्विट’ केले, ‘‘तुम्ही गेल्या चार वर्षांपासून अपयशी ठरत आहात. तुम्ही राजीनामा का देत नाही आणि मला अ श्रेणी का दिली गेली नाही. डेव्ह कॅमरन महामूर्ख आहेत.’’तिरंगी मालिकेतील तिसरा संघ श्रीलंका आहे. मालिका १४ ते २७ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. ब्राव्होच्या आक्षेपार्ह वर्तनानंतर संघात त्याच्या जागी जेसन मोहम्मदला स्थान देण्यात आल्याचे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.तिरंगी मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ पुढीलप्रमाणे : जेसन होल्डर (कर्णधार), सुलेमान बेन, देवेंद्र बिशू, कार्लोस ब्रेथवेट, क्रेग ब्रेथवेट, जोनाथन कार्टर, जॉन्सन चार्ल्स, मिगुएल कमिंस, शेन डोरिच, शेन गैब्रियल, शाई होप, एविन लुईस, जेसन मोहम्मद, अॅश्ले नर्स आणि रोवमॅन पॉवेल.(वृत्तसंस्था)
वेस्ट इंडीज संघातून डॅरेन ब्राव्हो ‘आउट’
By admin | Published: November 14, 2016 1:47 AM