सेंट जोन्स : वेस्ट इंडीजला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार डॅरेन सॅमी याचे नाव सेंट ल्युसिया येथील एका क्रिकेट स्टेडियमला दिले जाणार आहे. ब्युसेजोर क्रिकेट मैदान आता ‘डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट ग्राऊंड’ नावाने ओळखले जाईल. यातील एका भागाला सेंट ल्युसियाचाच अन्य एक खेळाडू जॉन्सन चार्ल्स याचेही नाव असेल. जॉन्सन चार्ल्सदेखील टी-२० वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाचा सदस्य आहे.वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळानुसार, सेंट ल्युसियाचे पंतप्रधान कॅनी डी अँथोनी यांनी याबाबतची घोषणा केली. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी आणि सलामीवीर जॉन्सन चार्ल्स यांना या सन्मानाबद्दल त्यांचे मंडळ अभिनंदन करते, असे वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने म्हटले आहे. वेस्ट इंडीजने २०१२मध्ये जेव्हा टी-२० वर्ल्डकप जिंकला होता, तेव्हाही सॅमी हाच कर्णधार होता. (वृत्तसंस्था)
क्रिकेट स्टेडियमला डॅरेन सॅमीचे नाव
By admin | Published: April 07, 2016 2:02 AM