ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 5- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरूत सुरू असलेल्या दुस-या कसोटी सामन्यात भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज आर. अश्विनने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियाचा धडाडीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला 33 धावांवर अश्विनने तंबूत धाडलं. यासोबत अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरला सर्वाधिक वेळेस बाद करणारा गोलंदाज बनला.
एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अश्विनने वॉर्नरला 8 व्यांदा बाद केलं. यापुर्वी इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अॅंडरसनने वॉर्नरला 7 वेळेस आउट केलं होतं. कांगारूंच्या विरोधात 12 वी कसोटी खेळणा-या अश्विनने वॉर्नरला दुस-यांदा त्रिफळाचीत केलं.
आतापर्यंत अश्विनने 8 वेळेस बाद केलं वॉर्नरला-
1. एडिलेड कसोटी जानेवारी 2012, वॉर्नर (28) , कॉट अॅन्ड बोल्ड अश्विन
2. चेन्नई: फेब्रुवारी 2013, वॉर्नर एलबीडब्ल्यू बॉ. अश्विन 59
3. हैद्राबाद: मार्च 2013, वॉर्नर बॉ. अश्विन 26
4. मेलबर्न : डिसेंबर 2014, वॉर्नर एलबीडब्ल्यू बॉ. अश्विन 40
5. सिडनी: जानेवारी 2015, वॉर्नर, कॅच- विजय बॉ. अश्विन 101
6. सिडनी: जानेवरी 2015, वॉर्नर कॅच. विजय बो. बॉ. अश्विन 4
7. पुणे फरवरी : 2017, वॉर्नर एलबीडब्ल्यू बॉ. अश्विन 10
8. बंगळुरु मार्च : 2017, वॉर्नर बॉ. अश्विन 33