शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचा समारोप

By admin | Published: January 17, 2017 3:22 AM

ठाणे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करसन सीताराम भगत स्मृती चषक २०१७ची रविवारी सांगता झाली.

नवी मुंबई : जिल्हा काँग्रेस कमिटी व इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब तसेच ठाणे लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करसन सीताराम भगत स्मृती चषक २०१७ची रविवारी सांगता झाली. वाशीगावातील शिवतीर्थ मैदानात आयोजित स्पर्धेला खेळाडूंचा तसेच क्रीडा रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून एक लढा- नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी असा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे ‘लोकमत’ हे माध्यम प्रायोजक होते. रविवारी झालेल्या सांगता सोहळ््यात क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आले. यामध्ये मालिकावीर,उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेमध्ये नवी मुंबई मर्यादित तसेच ४० प्लस या प्रकारचे तब्बल २४ संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ््याला महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम पारितोषिक विजेत्याला २ लाख व चषक देऊन गौरविण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक विजेत्याला १ लाख रुपये,तृतीय पारितोषिक विजेत्याला ५० हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. ४० प्लस मर्यादित क्रिकेट सामन्यातील प्रथम पारितोषिक विजेत्याला १० हजार आणि द्वितीय पारितोषिक विजेत्याला ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह दिले.मकरसंक्रांतीच्या निमित्ताने याठिकाणी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.चिमुरड्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्ती या महोत्सवात सहभागी झाल्या. प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांच्या जयंतीनिमित यांच्या कार्याची चित्रफीत याठिकाणी दाखविण्यात आली. नवी मुंबई पोलीस वाहतूक विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक सुरक्षे, वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणारी चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला लातूर लोकसभा अध्यक्ष धीरज देशमुख, युवा नेते परेश ठाकूर, वैभव नाईक , दीप भानुशाली, किस्मत पाटील, रोशन थॉमस,नगरसेविका फशीबाई भगत, वैजयंती भगत, रुपाली भगत, संजय यादव, संतोष पाटील, विनोद विसारिया, दीपक तांबे, राजेश पाटील, बालाजी यादव, विजय वाळुंज, अजय वाळुंज, अंजली वाळुंज आदी मान्यवर व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. (प्रतिनिधी)