नवी दिल्ली : विश्व चॅम्पियनशिपमध्ये स्थान मिळवणारा भारतीय बॉक्सर विकास कृष्णला यंदा आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत न खेळण्यासाठी ताकीद देऊन सोडले. त्यामुळे त्याच्याविरुद्धची शिस्तभंगाची कारवाई आता संपली आहे.ताश्कंदमध्ये ३० एप्रिल ते ७ मे या कालावधीत आयोजित आशियाई स्पर्धेदरम्यान अव्वल मानांकित मिडवलेट (७५ किलो) बॉक्सर विकासने उपांत्य फेरीच्या लढतीत कोरियाच्या ली डोंगयुनला पुढे चाल दिली होती.विश्वचॅम्पियनशिपचा माजी कांस्यपदकविजेता विकास २५ आॅगस्टपासून प्रारंभ होत असलेल्या विश्वचॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी सध्या भारताच्या आठ सदस्यांच्या संघासोबत जर्मनीतील हॅम्बुर्गमध्ये आहे.भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (बीएफआय) एका वरिष्ठ पदाधिकाºयाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, ‘जे काही घडले त्यासाठी त्याला ताकीद देण्यात आली आहे. आता हे प्रकरण मिटले आहे. शिस्तपालन समितीने त्याच्यासोबत चर्चा केली आणि ताकीद देणे पुरेसे असल्याचा निर्णय घेतला.’विकासला पॅरिसमध्ये ११ मे रोजी आयोजित विश्वबॉक्सिंग सिरीजच्या (डब्ल्यूएसबी) लढतीमध्ये सहभागी व्हायचे होते. प्रवासाबाबत त्याच्या मनात साशंकता होती, त्यामुळे त्याने आशियाई स्पर्धेतील लढतीतून माघार घेतली, असे विकासने स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर बीएफआयने या २५ वर्षीय बॉक्सरला डब्ल्यूएसबी लढतीमध्ये सहभागी होण्यास परवानगी दिली नव्हती.(वृत्तसंस्था)अनुभवी प्रशासक असित बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील समितीमध्ये राजेश भंडारी व निर्वाण मुखर्जी यांचा समावेश आहे.समितीने जुलै महिन्यात आपला अहवाल सादर करण्यापूर्वी विकास व भारतीय पथकासोबत ताश्कंदला गेलेल्या प्रशिक्षकांव्यतिरिक्त बीएफआयच्या काही अधिकाºयांची भेट घेतली.
विकासला केवळ ताकीद देऊन सोडले, उपांत्य फेरीत न खेळण्याचा घेतला होता निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 1:29 AM