धरमशाला : चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणारी निर्णायक कसोटी आजपासून येथे सुरू होत आहे. मैदानी आणि शाब्दिक चकमकीने गाजलेली ही मालिका अद्याप १-१ अशी बरोबरीत असली तरी मालिका जिंकण्यासाठी भारत आणि आॅस्ट्रेलिया संघ आसुसला आहे. कर्णधार विराट कोहलीचे खांदेदुखीमुळे खेळणे शंकास्पद वाटते. अशावेळी जिंकण्याचे दडपण पाहुण्यांच्या तुलनेत यजमानांवर अधिक जाणवते.सामन्याच्या पूर्वसंध्येला कोहलीने दिलेल्या संकेतानुसार तो खेळणार नसेल तर त्याची उणीव भरून काढणारा खेळाडू हवा. श्रेयस अय्यर अपयशी ठरल्यास भारताला मोठे नुकसान सोसावे लागेल. कोहलीने नेटवर सराव केला पण फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हेच माझ्या खेळण्याचा निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले. तथापि सामन्याआधी प्रतिस्पर्धी संघाला मानसिक बळ मिळू नये यासाठी विराट पत्रकारांपुढे देखील हजार झाला होता. नेटस्वर कसे वाटत होते असा सवाल करताना कोहली म्हणाला, ‘मुव्हमेंट वाढली की थोडे दुखणे उमळते. आज सायंकाळी किंवा उद्या सामन्याआधी निर्णय होईल. जोखीम पत्करणे धोकादायक ठरेल काय याचे उत्तर फिजिओ देतील. फिटनेसमध्ये पास झालो तर खेळेन.’अय्यर देखील येथे दाखल झाला आहे. त्याने सराव केला. कुंबळे आणि कोहली यांची श्रेयसच्या सरावावर बारीक नजर होती. कोहलीने नंतर मुंबईच्या या फलंदाजासोबत चर्चा केली. अय्यर आक्रमक फलंदाज असून तोे सर्व प्रकारचे फटके मारतो. अय्यरने आॅस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात दुहेरी शतक ठोकले होते. कट आणि पूल यामध्ये तरबेज असल्याने या खेळपट्टीवर तो चांगला पर्याय ठरेल. कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे असेल. तिसरा सामना अनिर्णीत राखल्याने स्टीव्ह स्मिथ आणि सहकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दुसरीकडे भारतही कसलीही कसर शिल्लक न राखता विजयाच्या इराद्यानेच उतरणार आहे. लोकेश राहुलकडून चांगली सुरुवात अपेक्षित असून दोन महिन्यांआधी तिहेरी शतक ठोकणाऱ्या करुण नायरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांच्याकडून शांतचित्त आणि कौशल्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित असेल. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेचे नेतृत्व पणाला लागलेले असेल. गोलंदाजी मात्र चिंतेचा विषय आहे. ईशांत शर्मा अपयशी ठरल्यामुळे भुवनेश्वरला संधी मिळू शकते. आॅस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत राखला तरी त्यांचा नैतिक विजय होईल. सामना जिंकलाच तर त्यांच्यासाठी अॅशेसपेक्षा हा मोठा विजय ठरणार आहे.हा संघ भारतात दाखल झाला तेव्हा आतापर्यंतचा सर्वांत कमकुवत संघ अशी गणना करण्यात आली. पण पहिलाच सामना जिंकल्याने चित्र बदलले. (वृत्तसंस्था)स्मिथचे झुंझार शतक, नाथन लियोनची दमदार गोलंदाजी, मॅट रेनशॉ आणि पीटर हॅण्डसकोम्ब यांची परिपक्व फलंदाजी हे आतापर्यंतच्या खेळाचे वैशिट्य ठरले. या सामन्यात वेगवान गोलंदाज जॅक्सन बर्डला फिरकीपटू स्टीव्ह कोकिफीचे स्थान मिळू शकते. ओकिफी रांचीत अपयशी ठरला होता. ईशांतच्या स्थानी शमीचा संघात समावेशधरमशाला : बंगालचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी ईशांतच्या स्थानी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ईशांतला या मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. शमीने नुकत्याच संपलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम लढतीत तामिळनाडूविरुद्ध २६ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले होते. शमी व श्रेयस अय्यर यांचा संघात समावेश करण्यात आला असून अंतिम ११ खेळाडूंच्या निवडीसाठी ते दावेदार आहेत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.जिंकण्याच्या इराद्याने खेळू-‘‘ आम्हाला दावेदार किंवा अंडरडॉग मानले गेले तरी फरक पडत नाही. मालिका -१-१ अशी बरोबरीत असताना सामना जिंकण्याच्या इराद्यानेच खेळणार आहोत. मी निकालाबाबत चिंताग्रस्त नाही. आपल्या हातात काय आहे, यावरच माझे लक्ष असते. ’’विराटपेक्षा अजिंक्य शांतचित्त‘‘विराटच्या तुलनेत अजिंक्य अधिक शांतचित्त व्यक्ती आहे. तो नेतृत्व देखील चांगले करेल. कोहलीच्या अनुपस्थितीचा आम्हाला फरक पडणार नाही. रहाणेवर भावनांचा परिणाम होत नाही. श्रेयस अय्यर हा देखील आक्रमक फलंदाज असल्याने भारताला कोहलीची उणीव जाणावणार नाही. ’’टीकांची मला पर्वा नाही‘‘ माझे अंत:करण निर्मळ आहे. मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो. कुणी शेषनाग म्हटले किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचेशी तुलना केली तरी टीकेला मी घाबरत नाही. क्रिकेटर आणि व्यक्ती म्हणून माझ्यात काय सुधारणा हवी हे मला ठाऊक आहे. माझ्या करिअरची सुरुवात देखील टीकांनीच झाली. खऱ्या गोष्टींची बाजू घेतली की टीका होणारच. माझ्या बोलण्याचे इतक्या लोकांना वाईट वाटले, याबद्दल त्यांना शुभेच्छा.’’तर जखम उमळेल‘‘खांद्याला जखम झाल्याने आता पुन्हा खेळलो तर जखम नव्याने उमळण्याचा धोका आहे. सामन्यात खेळण्याचा निर्णय घ्यायला काही तास आणखी लागतील.’’... तर विराटने खेळावे : गावस्करविराट कोहली पूर्णपणे फिट नाही, पण संघव्यवस्थापनाला जर त्याच्या खेळण्यामुळे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळत असेल तर त्याने शनिवारपासून आॅस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अखेरच्या कसोटी सामन्यात खेळावे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. धरमशाला येथे सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत कोहलीने म्हटले की, तो जर पूर्णपणे फिट असेल तरच चौथ्या कसोटी सामन्यात खेळेल. गावस्कर म्हणाले, ‘संघव्यवस्थापनाने निश्चित करायला हवे की, खेळाडू व कर्णधार म्हणून कोहलीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान द्यायला हवे.’54 कसोटीत सलग सहभागविराटने भारतीय कसोटी संघात २० जून २०११ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले. या दौऱ्यातील तिन्ही डावांत त्याने ७६ धावा केल्या. नंतर लगेचच इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. पण चारपैकी एकही सामना तो खेळू शकला नव्हता.२२ नोव्हेंबर २०११ ला पुनरागमनानंतर सलग ५४ कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान १६ शतके आणि १४ अर्धशतकांसह त्याने ४४२१ धावा केल्या. भारताकडून सलग कसोटी खेळण्याचा विक्रम सुनील गावस्कर(१०६ सामने) यांच्या नावावर आहे. ५० किंवा त्याहून अधिक सलग सामने खेळणाऱ्यांच्या यादीत कोहली ११ व्या स्थानावर आहे. भारत : विराट कोहली (कर्णधार),लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे, करुण नायर, रिद्विमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, अभिवन मुकुंद, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर आणि जयंत यादव .आॅस्ट्रेलिया : स्टीव स्मिथ (कर्णधार), मॅट रेनशॉ, डेव्हिड वॉर्नर, शॉन मार्श, पीटर हॅण्डस्कोम्ब, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), नाथन लियोन, जोस हेजलवुड, स्टीव ओकीफी,जॅक्सन बर्ड, मिशेल स्वेपसन, मार्कस स्टोनिस, ग्लेन मॅक्सवेल, एस्टन एगर, उस्मान ख्वाजा आणि पॅट कमिन्स.
निर्णायक कसोटी आजपासून
By admin | Published: March 24, 2017 11:55 PM