टोकियो : भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिला बुधवारी येथे कोरियाच्या १८ वर्षांच्या आॅन सानकडून सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिला २०२० टोकियो ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. पात्रता फेरीत चौथ्या स्थानावर असलेल्या दीपिका हिला दुसऱ्या मानांकित खेळाडू आॅन सानकडून चांगलीच कडवी स्पर्धा मिळाली. तिने ६-० असा सोपा विजय मिळवला.बर्लिनमध्ये नुकत्याच झालेल्या चौथ्या फेरीत दोन सुवर्णपदक जिंकणाºया आॅन सानने पहिल्या सेटमध्ये भारतीय खेळाडूला एका गुणाने मागे टाकले. कोरियन खेळाडूने दुसरा सेट २९-२५ असा जिंकला. अखेरच्या सेटमध्ये तिने परफेक्ट १०सोबत सुवर्णपदक मिळवले.दीपिकाने अंतिम फेरीतील पराभवानंतर सांगितले की,‘मी शानदार खेळ केला. मात्र अंतिम फेरीत माझा निशाणा चुकला. सध्या मी माझ्या तंत्रात काही बदल केले आहेत. मी त्याच्यासोबत सामंजस्य बसवत आहे.’ दीपिका पुढे म्हणाले की,‘मी यातून खूप काही शिकले आहे. त्यात मी सुधारणा करेल.’ भारतीय महिला संघाने अजून आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवलेली नाही. मात्र दीपिका कुमारीने सांगितले की,‘आम्ही हे स्थान पाहिले आहे. आशा आहे की आम्ही प्रदर्शन पुढे कायम ठेऊ, आणि आॅलिम्पिक पात्रतादेखील मिळवू.’ (वृत्तसंस्था)
तिरंदाजीत दीपिकाला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:28 AM