ऑनलाइन लोकमत -
दिल्ली, दि. 30 - दिल्ली डेअरडेव्हील्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 187 धावाचं आव्हान ठेवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या गोलंदाजांनी निर्णय योग्य ठरवत पहिल्याच ओव्हरमध्ये रुसेलने दिल्लीच्या दोन विकेट्स काढल्या. श्रेयस अय्यर आणि कॉक यांना पहिल्याच ओव्हरमध्ये रुसेलने तंबूत परत पाठवलं. दोन धावांवर दोन विकेट अशी दिल्लीची परिस्थिती झाली होती.
चौथ्या विकेटसाठी करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने केलेल्या पार्टनरशिपमुळे दिल्लीचा संघ सावरला. करुण नायर आणि सॅम बिलिंग्सने 105 धावांची पार्टनरशिप केली. दिल्ली संघाची चौथ्या विकेटसाठी ही रेकॉर्ड पार्टनरशिप झाली आहे. करुण नायरने 50 चेंडूत 68 धावा केल्या तर सॅम बिलिंग्सने 34 चेंडूत 54 धावा केल्या. दिल्लीने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 186 धावा केल्या आहेत. दिल्लीकडून रुसेल आणि उमेश यादवने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.