शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

टायटन्सकडून दिल्ली पराभूत

By admin | Published: February 25, 2016 3:47 AM

प्रो-कबड्डीच्या यंदाच्या मोसमातील घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या दबंग दिल्लीची अपयशी मालिका येथेही कायम राहिली. तेलगू टायटन्स विरुद्ध कडवा प्रतिकार केल्यानंतरही

- रोहित नाईक,  नवी दिल्लीप्रो-कबड्डीच्या यंदाच्या मोसमातील घरच्या मैदानावर पहिला सामना खेळणाऱ्या दबंग दिल्लीची अपयशी मालिका येथेही कायम राहिली. तेलगू टायटन्स विरुद्ध कडवा प्रतिकार केल्यानंतरही दिल्लीकरांना ३६-४४ असा पराभव पत्करावा लागला. आतापर्यंत १० सामने खेळलेल्या दबंग दिल्लीला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आलेला आहे. त्यागराज क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या सामन्यात सुरुवातीला तेलगूने वर्चस्व राखल्यानंतर दिल्लीने अनपेक्षित मुसंडी मारत बरोबरी साधली. १०व्या मिनिटाला तेलगूने दिल्लीवर पहिला लोण चढवल्यानंतर दिल्लीने केवळ ४ मिनिटांमध्ये या लोणची परतफेड केली. मध्यंतराला तेलगूने २२-२१ अशी नाममात्र आघाडी घेतली होती.यानंतर मात्र तेलगू टायटन्सने सलग गुण मिळवण्याचा धडाका लावत यजमानांवर प्रचंड दबाव टाकला. यामुळे दिल्लीकरांच्या पकडीही अपयशी ठरल्या आणि त्याचा परिणाम आक्रमकांवर झाला. या संधीचा अचूक फायदा घेताना तेलगूने दुसऱ्या डावात आणखी २ लोण चढवताना दिल्लीचा पराभव निश्चित केला. तेलगू टायटन्सकडून कर्णधार राहुल चौधरीने तुफानी अष्टपैलू खेळ करताना तब्बल १७ गुणांची कमाई केली. रोहित बलियाननेदेखील खोलवर चढाई करताना १० गुणांसह राहुलला चांगली साथ दिली. तसेच मिराज शेखचा अष्टपैलू खेळ आणि राहुल कुमारच्या दमदार पकडीही तेलगूच्या विजयात मोलाचे ठरले. दुसरीकडे दिल्लीकडून सुरजीत सिंगने एकाकी झुंज देताना आक्रमणात १३ गुण मिळवले. तर कर्णधार रविंदर पहल आणि संदीप धूल यांनी अनुक्रमे एक व दोन सुपर टॅकल करताना अपयशी लढत दिली.