शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

दिल्ली-केकेआर आज लढत

By admin | Published: April 10, 2016 3:39 AM

टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चार षट्कार ठोकून ‘किंग’ बनलेला वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट याच्या कामगिरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स

कोलकाता : टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये सलग चार षट्कार ठोकून ‘किंग’ बनलेला वेस्ट इंडिजचा कार्लोस ब्रेथवेट याच्या कामगिरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील लढतीदरम्यान विशेष लक्ष राहील. ईडन गार्डनवर आज रविवारची रात्र पुन्हा एकदा अविस्मरणीय करण्याची संधी कार्लोसकडे असेल.मागच्या रविवारी ब्रेथवेटने इंग्लंडविरुद्ध बेन स्टोक्सला चार षट्कार खेचले होते. त्याचा हा फॉर्म कायम रहावा, असे डेअरडेव्हिल्सला वाटते. दुसरीकडे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआरचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड उत्तमच आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत अपेक्षानुरुप कामगिरी न करू शकलेल्या या संघाला संयोजन सुधारावे लागेल. केकेआरला पाच वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी पहिल्या सामन्यापासून विजयी लय कायम राखायची आहे. दिल्लीने यंदा संघात आमूलाग्र बदल केले. युवा खेळाडूंवर यंदा अधिक विश्वास दाखविण्यात येत आहे. ब्रेथवेटवर या संघाने चार कोटी २० लाख खर्च केले तेव्हा फारसे कुणी ओळखत नसावेत पण टी-२० विश्वचषकाने त्याला स्टार बनविले. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखालील दिल्ली संघात रिषभ पंत, महिपाल लोमरोर, खलिद अहमद हे १९ वर्षे गटातील खेळाडू आहेत. संजू सॅमसन, करुण नायर, पवन नेगी, श्रेयस अय्यर हे त्यांना मार्गदर्शन करतील. बंगाल विधानसभा निवडणुकीमुळे केकेआरला पहिल्या टप्प्यात घरच्या मैदानावर केवळ दोनच सामने खेळायला मिळतील. सहा सामने त्यांना बाहेर खेळायचे आहेत. दुसऱ्या टप्प्यात पुन्हा ईडनवर खेळायला मिळेल. या संघाची भिस्त आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, मनीष पांडे आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. सुनील नारायण संघात परतल्याने या संघाला फिरकी माऱ्यात मोठा दिलासा लाभला. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारकोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, युसूफ पठाण, पीयूष चावला, कुलदीप यादव, मनन शर्मा, अंकित राजपूत, राजगोपाल सतीश, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जॉन हेस्टिंग्स, ब्रॉड हॉग, जेसन होल्डर, शेल्डन जॅक्सन, ख्रिस लिन, मोर्नी मोर्कल, सुनील नारायण, कोलिन मुन्रो, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन. दिल्ली डेयरडेविल्स : झहीर खान (कर्णधार), क्वींटन डिकॉक, जेपी ड्यूमिनी, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, पवन नेगी, ऋषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयाल, जयंत यादव, ख्रिस मॉरिस, सॅम बिलिंग्स, नाथन कोल्टर नाइल, इम्रान ताहिर, महिपाल लोमोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, शाहबाज नदीम, खलील अहमद, अखिल हर्वेडकर, प्रत्यूष सिंग.