दिल्ली-मुंबई रणजी
By admin | Published: February 20, 2015 1:10 AM
मुंबईिवरुद्ध दिल्लीचा संघर्ष
मुंबईिवरुद्ध दिल्लीचा संघर्षकटक : रणजी करंडक उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मुंबईने विजयासाठी दिलेल्या ४४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची आज चौथ्या दिवसअखेर ४ बाद ११० अशी अवस्था झाली आहे. अखेरच्या दिवसाचा खेळ शिल्लक असलेल्या या लढतीत दिल्ली संघाला विजयासाठी ३३१ धावांची गरज असून त्यांच्या ६ विकेट शिल्लक आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी २५ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या रजत भाटिया याला मनन शर्मा (१४) साथ देत होता. त्याआधी, ४० वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मुंबई संघाने कालच्या ७ बाद ३७६ धावसंख्येवरून पुढे खेळताना दुसऱ्या डावात ४५० धावांची मजल मारली. सिद्धेश लाडने १३३ चेंडूंना सामोेर जाताना ९ चौकारांच्या साहाय्याने ५५ धावांची खेळी केली तर दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हरमित सिंगने ३० धावांचे योगदान दिले. दिल्लीतर्फे मनन शर्माने ४ बळी घेतले तर सुमिन नरवाल व प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. विजयासाठी ४४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली संघाची सुरुवात निराशाजनक झाली. उन्मुक्त चंद (३१) याला माोठी खेळी करण्यात अपयश आले. शार्दूल ठाकूरने गंभीरला माघारी परतवत दिल्लीचा डाव अडचणीत आणला. त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर मिथुम मन्हास माघारी परतला. (वृत्तसंस्था)