शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन : पी. व्ही. सिंधू, समीर वर्मा यांना पराभवाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:36 PM

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला कोरियन प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध ४० मिनिटांत १४-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.

ओडेन्से : विश्वविजेती पी. व्ही. सिंधूचे डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अन सी यंगविरुद्ध पराभवासह आव्हान संपुष्टात आले. पाचवे मानांकन प्राप्त व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूला कोरियन प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध ४० मिनिटांत १४-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.ऑगस्ट महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर सिंधूचा सुरुवातीच्या फेरीमध्ये सलग तिसरा पराभव आहे. तिला चायना ओपनच्या दुसºया व कोरिया ओपनच्या पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. भारताच्या समीर वर्माला एकेरीत आणि पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकिरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. समीर ऑलिम्पिक चॅम्पियन चीनच्या चेन लोंगविरुद्ध २१-१२, २१-१० ने पराभूत झाला. समीरला लोंगच्या वेगवान खेळापुढे फारशी संधी मिळाली नाही. थायलंड ओपन चॅम्पियन सात्विक व चिराग जोडीचा सहाव्या मानांकित चीनच्या चेंग केई व झोऊ हाओ दोंग यांच्याकडून २१-१६, २१-१५ असा पराभव झाला.

सिंधूने पुन्हा केली निराशाजागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर सिंधूला लौकिकानुसार खेळ करण्यात यश आलेले नाही. या स्पर्धेत जबरदस्त विजयी सलामी दिल्यानंतर सिंधू फॉर्ममध्ये आल्याचे वाटले. मात्र, दुसºया फेरीत पुन्हा एकदा सिंधूकडून निराशा झाली. पहिला गेम सहजपणे गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तिने झुंज दिली खरी, मात्र सामना जिंकण्यात ती अपयशी ठरली.

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton