ऑलिम्पिक सहभागावरून वाद न उद्भवण्याची पेसची इच्छा
By admin | Published: June 08, 2016 1:50 AM
नवी दिल्ली : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याच्या रिओ ऑलिम्पिकमधील सहभागाबाबत अजूनही अनिश्चितता असताना त्याने पुन्हा एकदा या मुद्द्यावरून कोणताही वाद न होण्याची इच्छा व्यक्त केली असून, या क्रीडा कुंभमेळ्यासाठी भारताने आपला सर्वश्रेष्ठ संघ पाठविण्याची आशा व्यक्त केली.
नवी दिल्ली : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस याच्या रिओ ऑलिम्पिकमधील सहभागाबाबत अजूनही अनिश्चितता असताना त्याने पुन्हा एकदा या मुद्द्यावरून कोणताही वाद न होण्याची इच्छा व्यक्त केली असून, या क्रीडा कुंभमेळ्यासाठी भारताने आपला सर्वश्रेष्ठ संघ पाठविण्याची आशा व्यक्त केली.विशेष म्हणजे, दुहेरीचा स्टार रोहन बोपन्ना याने अजूनही आपला जोडीदार घोषित केलेला नसल्याने सर्वांची उत्सुकता ११ जून रोजी होणार्या एआयटीएच्या निवड समितीच्या बैठकीवर लागली आहे. ऑलिम्पिक सहभागाविषयी पेसला विचारले असता त्याने सांगितले, 'नक्कीच लंडन ऑलिम्पिकच्या वेळी झालेली घटना पुन्हा एकदा या वेळी घडू नये, अशीच आमची अपेक्षा आहे. आम्ही सध्या उच्च दर्जाचा खेळ खेळत असून, माझ खेळ सर्व काही सिद्ध करीत आहे. तसेच, रोहनही १८ महिन्यांपासून चांगली कामगिरी करीत आहे. आम्ही दोघेही तयार असून, माझी व त्याची टीम नक्कीच सर्वश्रेष्ठ आहे.'२०१२मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये पेसला आपल्या आवडीच्या जोडीदारासह खेळण्यापासून रोखण्यात आले होते. त्यामुळे त्याला युवा विष्णुवर्धनसह खेळावे लागले होते. कारण, त्या वेळी रोहनने दिग्गज महेश भूपतीसह खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावरून मोठा वाद झाला होता आणि सर्वच टेनिसपटूंना रिकाम्या हाताने लंडन ऑलिम्पिकमधून परत यावे लागले होते. (वृत्तसंस्था)०००