शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

देवेंद्रो उपांत्य फेरीत

By admin | Published: June 22, 2016 3:21 AM

राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता देवेंद्रो सिंहने ४९ किलो गटात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून जागतिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

अजरबजान : राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता देवेंद्रो सिंहने ४९ किलो गटात आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून जागतिक पात्रता मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. दुसरीकडे सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (६४ किलो गट) व सुमीत सांगवान (८१ किलो गट) यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळविण्यासाठी त्यांना आता केवळ एका विजयाची आवश्यकता आहे. चौथे मानांकन असलेल्या देवेंद्रोने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या के. बांडला सिबुसिसोला ३-० गुणांनी पराभूत करून आपले पदक निश्चित केले. आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महासंघाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. मनोजने बुल्गेरियाच्या इस्मेतोव आयरिन याला २-१ने, तर सुमीतने मंगोलियाच्या संदागसुरेन एरदेनेबयार याच्यावर ३-०ने सहज विजय मिळवित आगेकूच केली. आॅलिम्पिक तिकिटापासून हे दोघे केवळ एक पाऊल मागे आहे. गुरुवारी होणाऱ्या सामन्यात या दोघांनी विजय मिळविल्यास त्यांचा आॅलिम्पिक विजय निश्चित होईल. मंगळवारी मनोजची पहिली लढत झाली. त्यात त्याने बाजी मारली. या पूर्वी झालेल्या पहिल्या फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. याविषयी बोलताना गुरुबक्ष सिंग संधू म्हणाले की, मनोजसाठी हा मोठा सामना होता. त्याचा प्रतिस्पर्धी वेगवान ठोसे मारत होता. त्यातच दुसऱ्या फेरीत प्रतिस्पर्धी आयरिनचा जोरदार ठोसा लागल्याने त्याला काहीशी जखमही झाली होती. त्या स्थितीतही त्याने सामना केला. मध्यंतरी त्याचा वेग कमी झाल्याचा फायदा घेत मनोजने बाजी मारली. आता मनोजची पुढील लढत आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या तजाकिस्तानच्या राखिमोव शवकताजोन याच्याशी होईल. शवकताजोन याने अंतिम १६मध्ये झालेल्या लढतीत बहारिनच्या विलियम्स राशिल्ड याला नमविले होते, तर सुमीतची पुढील लढत रशियाच्या पेत्र खामुकोव याच्याशी होईल. खामुकोव याने या पूर्वीच्या सामन्यात स्लोवाकियाच्या डेनिस लेजर याला नमविले होते. या स्पर्धेतून आॅलिम्पिकसाठी ३९ कोटा दिला जाणार आहे. त्यात ४९ किलो गटात दोन, तर ५२, ५६, ६०, ६४, ६९, ७५ व ८१ किलो गटात प्रत्येकी पाच, तर ९१ व त्यापेक्षा अधिक गटासाठी प्रत्येकी एक कोटा आहे. (वृत्तसंस्था)