लंडन : फारसा प्रकाशझोतात नसलेला खेळाडू देवींदरसिंह कांग जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकमध्ये फायनलमध्ये धडक मारणारा पहिला भारतीय बनला आहे; मात्र नीरज चोप्राचे पात्रता फेरीतच आव्हान संपले.कांग याचा जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील सहभाग धोक्यात आला होता. जून महिन्यात मरिजुआनाचे सेवन करण्यात तो दोषी आढळला होता आणि हा पदार्थ आचारसंहितेनुसार निलंबनाच्या क्षेत्रात येत नाही. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले होते. याआधी कोणताही पुरुष खेळाडू भारतीय विश्व चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत फायनलमध्ये पोहोचला नव्हता. आतापर्यंत या स्पर्धेत भारतीयांच्या हाती निराशा आली असल्याने कांगच्या कामगिरीने भारतीय गोटाला दिलासा मिळाला.त्याआधी पहिल्या अ गटाच्या क्वॉलिफिकेशनमध्ये भारताची पदकांची सर्वात मोठी पदकांची आशा असणारा नीरज प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. आपल्या युवा खांद्यावर देशाच्या अपेक्षांचे ओझे घेऊन उतरलेल्या नीरजने सर्वोत्तम ८२.२६ मीटरचा थ्रो पहिल्या प्रयत्नात केला. ज्युनिअर विश्व विक्रमवीर नीरजचा दुसरा प्रयत्न फाऊल ठरला आणि तिसºया प्रयत्नात तो ८0.५४ मीटरपर्यंतच थ्रो करू शकला. तिथेच क्वॉलिफिकेशनच्या ब गटात उतरलेल्या कांग याने तिसºया आणि अखेरच्या थ्रोमध्ये ८३ मीटरचे क्वॉलिफिकेशन मार्क गाठला. त्याने ८४.२२ मीटरचा थ्रो फेकला. पहिल्या थ्रोमध्ये त्याने ८२.२२, तर दुसºया फेरीत त्याने ८२.१४ मीटर भाला फेकला. खांद्याच्या दुखापतीशी संघर्ष करणाºया पंजाबच्या या २६ वर्षीय खेळाडूवर अखेरच्या प्रयत्नात ८३ मीटरचे अंतर गाठण्याचा दबाव होता; परंतु त्याने चाहत्यांना निराश केले नाही. अ गटातून पाच आणि ब गटातून सात खेळाडू पात्र ठरले. उद्या हे सर्वच फायनलमध्ये खेळतील.कांग अखेरच्या पात्रता फेरीत सातव्या स्थानी राहिला. मे महिन्यात दिल्लीत इंडियन ग्रां प्रीमध्ये खांद्याला दुखापत झाली होती आणि काल त्याने खांद्याला पट्टी बांधून सहभाग नोंदवला. त्यामुळे त्याची कामगिरी ही कौतुकास्पद ठरली आहे.अंतिम फेरी गाठल्यानंतर कांग म्हणाला, ‘‘नीरज पात्र ठरला नसल्याचे माहीत झाल्यानंतर मी अंतिम फेरीत पात्र ठरू इच्छित होतो. मी देशासाठी काही करू इच्छित होतो जे की कोणत्याही भारतीयाने केले नाही. देवाच्या कृपेने मी असे करण्यात यशस्वी ठरलो.’’नीरज म्हणाला, ‘‘मी माझ्यातर्फे सर्वोत्तम प्रयत्न केला; परंतु निराशा हाती लागली. मी पहिल्या थ्रोमध्ये खूप मेहनत घेतली; परंतु काही सेंटिमीटरने थ्रो कमी पडला. दुसºया थ्रोमध्ये अडचण आली होती आणि तिसरा दूर पडला. प्रशिक्षक बरोबर आले असते तर चांगले झाले असते; परंतु हे माझ्या हातात नव्हते. आज काय झाले हे मला समजलेच नाही.’’
देवींदरसिंह कांग भालाफेकीत फायनलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:58 AM