नवी दिल्ली : विश्वकप स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या १५ सदस्यांच्या भारतीय संघाची फलंदाजी मजबूत मानली जाते, पण कर्णधार महेंद्रसिंह धोनी व विराट कोहली यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना यमजान देश असलेल्या आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागल्याचे चित्र आहे.भारतातर्फे सध्या शिखर धवन व रोहित शर्मा डावाची सुरुवात करीत आहेत. या दोन्ही फलंदाजांची आॅस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील कामगिरी निराशाजनक आहे. आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये या दोन्ही फलंदाजांची यापूर्वीची कामगिरी प्रभावशाली नाही. विश्वकप स्पर्धेत भारताला साखळी फेरीत आॅस्ट्रेलियात चार तर न्यूझीलंडमध्ये दोन सामने खेळावे लागणार आहे. रोहितने आॅस्ट्रेलियात १५ वन-डे सामने सामने खेळले असून त्याने केवळ २६.१५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. अबांती रायडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. रायडूने आतापर्यंत आॅस्ट्रेलियात एकही सामना खेळलेला नाही. न्यूझीलंडमध्ये त्याला दोन वन-डे सामने खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात त्याने ५७ धावा फटकाविल्या. (वृत्तसंस्था)
वन-डेमध्ये धोनी व कोहलीची चमक
By admin | Published: January 14, 2015 2:18 AM